रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये कहर करत आहे. हे एवढं खतरनाक आहे, की याच्यापुढे इंग्लंडची प्रसिद्ध ‘बेझबॉल’ शैली देखील फेल ठरेल!
बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीतील पहिल्या डावात भारतानं अशी फलंदाजी केली, जी इतिहासात यापूर्वी कधीच झाली नव्हती. भारतानं या डावात सर्वात वेगवान 50 धावा, सर्वात वेगवान 100 धावा, सर्वात वेगवान 150 धावा, सर्वात वेगवान 200 धावा आणि सर्वात वेगवान 250 धावांचा विक्रम मोडला. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगानं या धावांचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्ड भारतीय संघाच्या नावे झाला आहे.
बांगलादेशविरुद्ध भारतीय संघानं अवघ्या 3 षटकांत 50 धावा केल्या. हा नवा रेकॉर्ड आहे. यानंतर टीम इंडियानं 100 धावा 10.1 षटकांत, 150 धावा 18.2 षटकांत, 200 धावा 24.2 षटकांत आणि 250 धावा 30.1 षटकांत पूर्ण केल्या.
यशस्वी जयस्वालनं (51 चेंडूत 72 धावा) प्रथम कर्णधार रोहित शर्मासह (11 चेंडूत 23 धावा) तुफानी सलामी दिली. यानंतर विराट कोहली (35 चेंडूत 47 धावा) आणि केएल राहुल (43 चेंडूत 68 धावा) यांनी ही लय कायम ठेवली. शुबमन गिलनं देखील 36 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. अखेरीस आकाशदीपनं 5 चेंडूत 12 धावा ठोकल्या. त्यानं सलग 2 चेंडूवर 2 षटकार हाणले. अशाप्रकारे भारतीय संघानं अवघ्या 34.4 षटकांत 285 धावा ठोकल्या.
बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीत भारत
कसोटीतील सर्वात जलद 50 धावा – 3 ओव्हर्स
कसोटीतील सर्वात जलद 100 धावा – 10.1 ओव्हर्स
कसोटीतील सर्वात जलद 150 धावा – 18.2 ओव्हर्स
कसोटीत सर्वात जलद 200 धावा – 24.2 ओव्हर्स
कसोटीतील सर्वात जलद 250 धावा – 30.1 ओव्हर्स
हेही वाचा –
एकमेव, अद्वितीय किंग कोहली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, क्रिकेटच्या देवालाही मागे टाकलं!
22 वर्षीय यशस्वीची धमाल! सेहवागचा 16 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, रोहित-यशस्वीच्या जोडीनं केला महापराक्रम!