इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील तिसरा कसोटी सामना बुधवार (२५ ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले होते. ज्यामध्ये पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघावर दमदार विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत १-० ने आघाडी मिळवली.
ही आहे संघासाठी चिंतेची बाब
भारतीय संघ मालिकेत आघाडीवर असला तरी, संघासाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. ती म्हणजे खेळाडू खराब फटका मारून आपला बळी गमावत आहेत. कर्णधार विराट कोहली या मालिकेत ‘कव्हर ड्राईव्ह’ मारण्याच्या नादात बाद होतोय. तर, सलामीचा फलंदाज रोहित शर्मा देखील त्याचा आवडता ‘पूल शॉट’ खेळताना बाद झाला. यामुळे खेळाडूंच्या फटक्यांच्या निवडीबाबत आता सर्वत्र टीका केली जात आहे.
फलंदाजी प्रशिक्षक झाले निराश
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीदेखील रोहितच्या फटक्यांच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राठोड म्हणाले, “आम्हाला हे खूप ऐकायला मिळत आहे की, रोहित हा फटका खेळताना काय विचार करत असतो. रोहितबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आधीच स्पष्ट केले होते की, तो पूल मारून जास्त धावा करू शकतो. अशावेळी रोहितला पूल शॉट खेळण्यापासून रोखले जाणार नाही. उलट त्याचे समर्थन करू. मात्र, माझ्या मते रोहितने फटका निवडण्याबाबत आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. यावर जर रोहितला आमच्याशी चर्चा करायची असेल तर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत.”
मालिकेत तीन वेळा पूल मारताना बाद झाला रोहित
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या तीन कसोटीत रोहित तीन वेळा पूलचा फटका मारताना बाद झाला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही १०५ चेंडू खेळल्यानंतरही तो अशाच प्रकारे बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने शानदार अर्धशतक साजरे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्यात नीरज चोप्राच्या नावाने स्टेडियमचे उद्घाटन, ‘गोल्डन बॉय’ने ‘या’ शब्दात मानले आभार
बिग ब्रेकिंग! एका तपानंतर ख्रिस्टीआनो रोनाल्डो पुन्हा खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
रोहित रिव्ह्यू सिस्टीम! हिटमॅनच्या ‘त्या’ निर्णयाने मिळाले केएल राहुलला जीवदान