आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानासाठी सध्या ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघात प्रचंड चढाओढ दिसत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच पहिले स्थान मिळवले आहे . दुसरीकडे भारताने देखील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे, त्यामुळे भारतालाही क्रमवारीत अव्वल स्थान पटकवण्याची मोठी संधी मिळाली आहे.
सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचे 116 तसेच ऑस्ट्रेलियाचे देखील 116 अंक आहेत. मात्र न्युझीलंडने ऑस्ट्रेलिया पेक्षा 2 सामने कमी खेळलेले असल्याने ते पहिल्या स्थानावर आहेत. भारतीय संघाचा विचार केला असता नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत भारतीय संघाचे 114 गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर असला तरी अव्वल स्थानावर जाण्याची भारतीय संघाकडे मोठी संधी आहे. सध्या क्रिकेट विश्वामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान अशा दोन महत्वाच्या मालिका सुरू आहेत. या दोन मालिकांमधील निर्णय भारताच्या बाजूने गेल्यास कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणे भारतीय संघाला शक्य होणार आहे.
जर न्यूझीलंड संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर ते अव्वल स्थानाचे प्रबळ दावेदार बनतील. मात्र जर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला अथवा सामना अनिर्णित राहिला तर ऑस्ट्रेलिया व भारताला क्रमवारीत पहिले स्थान मिळवणे शक्य होणार आहे. जर भारतीय संघ पुढील दोन्ही सामने जिंकला व पाकिस्तानने न्यूझीलंड विरुद्ध विजय अथवा सामना अनिर्णित केला तर भारतीय संघ क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवले. जर भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 2 -2 ने बरोबरीत राहिली तर न्युझीलंड क्रमांक एक वर राहतील. जर ऑस्ट्रेलियाने पुढील दोन्ही सामन्यात भारताचा पराभव केला तर तेदेखील वर जाऊ शकतात.
या सर्व शक्यतांमध्ये सर्वात महत्त्वाचा सामना असेल तो न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघामधील. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आशा करेल की पाकिस्तान संघ न्यूझीलंडचा पराभव करेल ज्यामुळे दोघांनाही आयसीसी कसोटी क्रमवारीत मानाचे अव्वल स्थान मिळवणे शक्य होईल.
महत्वाच्या बातम्या:
– कसोटी क्रमवारीत कोहली, स्मिथवर वरचढ ठरूनही विलियम्सनला नाही गर्व, म्हणाला
– सिडनी कसोटी जिंकायची, तर टीम इंडियातील या तीन खेळाडूंना कराव्या लागतील सुधारणा
– आगामी दशकात धावांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी हे ५ भारतीय खेळाडू सज्ज, शुभमन गिलचाही समावेश