कोरोना महामारीनंतर क्रिकेटजगत पुन्हा एकदा सुरू झाले असले तरी, या आजारामुळे खेळाडूंवर होणारा मानसिक परिणाम अनेक मोठ्या स्पर्धा न होण्यास कारणीभूत ठरत आहे. याच कारणाने नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द करण्यात आला. भारतीय संघ या दौऱ्यावर वर्ल्ड सुपर लीगमधील तीन वनडे सामने खेळणार होता. आता हा दौरा एक वर्ष पुढे ढकलण्यात आला आहे. २०२२ टी२० विश्वचषकानंतरच ही मालिका खेळवण्यात येऊ शकते.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केली घोषणा
भारतीय संघ चालू वर्षाच्या अखेरीस हा दौरा करणार होता. मात्र, आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. आता हा दौरा पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतरच खेळला जाईल. हा दौरा रद्द होण्यामागे खेळाडूंची मानसिक स्थिती व अति क्रिकेट हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या न्यूझीलंडचे खेळाडू बांगलादेश दौऱ्यानंतर मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आहेत. तसेच, काही खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएईला पोहोचलेत. आयपीएलनंतर युएई येथेच टी२० विश्वचषक खेळला जाईल. त्यानंतर, न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान भारतामध्ये कसोटी मालिका खेळविण्यात येईल. या अति क्रिकेटमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही न्यूझीलंडने रद्द केल्या अनेक मालिका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट संघाला आत्तापर्यंत अनेक मालिका रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे अनेक संघ आता त्या मालिका न्यूझीलंडमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतील. न्यूझीलंडला आगामी काळात दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स व बांगलादेश विरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कट्टर आरसीबीप्रेमी! विराटच्या टीमचे नाव कोरत सचिनची जबरदस्त हेयरस्टाईल, चाहत्यांना खूपच आवडली
‘महामुकाबल्या’त धोनीला टक्कर देण्यासाठी इशान घेतोय यष्टीरक्षणाची ‘स्पेशल ट्रेनिंग’, VIDEO पाहिला का?