भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना एॅडलेड येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर 8 गडी राखून मात केली. मात्र या सामन्यात भारतीय युवा फलंदाज पृथ्वी शाॅ दोन्ही डावात अपयशी ठरला. त्यामुळे सर्व बाजूंनी त्याच्यावर टीका झाली. परंतु पृथ्वी शाॅने टीकाकारांबद्दल बाळगलेले मौन सोडले. त्याच्या खराब कामगिरीवर प्रश्न उपस्थित करताना टीकाकारांने त्याच्या टेक्निवर चर्चा केली होती. त्याचबरोबर त्याच्या जागी शुभमन गिलला संधी दिली जावी म्हणून चर्चा सुरू आहे.
पृथ्वी शाॅने सोडले मौन
आयपीएल 2020 पासून पृथ्वी शाॅ फॉर्ममध्ये दिसला नाही. यामुळे त्याच्या खेळीवर प्रत्येकजण टीका करताना दिसून येत आहे. यावर आता पृथ्वी शाॅने मौन सोडले आहे. तो आपल्या इंस्टाग्रामवरच्या स्टोरीच्या माध्यामातून व्यक्त झाला आहे. या मुंबईकर खेळाडूने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीत लिहले, “जर आपण कोणते काम करतो, आणि इतर कोणीही आपले सतत खच्चीकरण करतो, तर याचा अर्थ आहे की ती व्यक्ति हे काम करू शकत नाही, मात्र आपण करू शकतो.”
Instagram story of Shaw. pic.twitter.com/W95yGA8e7z
— Johns. (@CricCrazyJohns) December 20, 2020
दोन्ही डावात पृथ्वी शाॅ त्रिफळाचीत झाला होता
पृथ्वी आत येणार्या चेंडूवर खेळताना नेहमी अडचणीत आला आहे. तो शॉट मारताना त्याच्या बॅट आणि पॅड मध्ये गॅप निर्माण होतो. त्या गॅपला गोलंदाज लक्ष करतात. यामुळेच पृथ्वी दोन्ही डावात त्रिफळाचीत झाला आहे. पहिल्या सामन्यात तो आपले खातेही न उघडता मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला होता. त्याचबरोबर दुसर्या डावातही पॅट कमिन्सच्या आत येणार्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला होता. तेव्हा तो फक्त 4 धावांवर माघारी परतला होता. त्यामुळे दोन्ही डावात फक्त तो 6 चेंडूचा सामना करू शकला.
गचाळ क्षेत्ररक्षण करताना सोडला होता झेल
पहिल्या डावात खाते न उघडता बाद झालेला पृथ्वी गचाळ क्षेत्ररक्षण करताना दिसून आला. त्याने क्षेत्ररक्षण करताना मार्नस लाबुशेन याचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर विराट कोहलीने त्याला शिविगाळ केली होती.
सराव सामन्या सुद्धा केली होती निराशाजनक कामगिरी
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शाॅला पहिल्या दोन सराव सामन्यात सुद्धा संधी मिळाली होती. त्याने दोन सराव सामन्याच्या चार डावात 0, 19, 40 आणि 3 अशा धावा काढल्या होत्या. परंतु तरीही त्याचा पहिल्या कसोटी सामन्यात समावेश केला होता. मात्र दोन्हीकडे पृथ्वी शाॅ संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला.
महत्वाच्या बातम्या:
– पाकिस्तानचा सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव, न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
– दुःखद! कोरोनामुळे सचिनच्या जिवलग मित्राचा मृत्यू, एकेकाळी सोबत खेळले होते क्रिकेट
– नवी आयसीसी क्रमवारी जाहीर; मैदानापाठोपाठ इथेही भारतीयांच्या उडाल्या दांड्या