भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये येत्या ६ फेब्रुवारी पासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्नात असणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली होती. आता भारतीय संघातील खेळाडू आगामी वनडे मालिकेसाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरताना दिसून येणार आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो दुखापतग्रस्त असल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौरा जाऊ शकला नव्हता. परंतु, तो आता पूर्णपणे फिट असून, वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेत संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) याने शनिवारी (२९ जानेवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तो विमानात शिखर धवनसोबत असल्याचे दिसून आले होते. भारतीय संघातील खेळाडू अहमदाबादला पोहचले असून, या खेळाडूंना विलागिकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाईल. ही चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात येतील.”
तसेच वेस्ट इंडिज संघाने नुकताच इंग्लंड संघाला टी२० मालिकेत पराभूत केले आहे. वेस्ट इंडिज संघ लवकरच भारतात येणार आहे. इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास नक्कीच उचांवला असेल.
https://www.instagram.com/p/CZWueO9PZTd/?utm_medium=copy_link
असा आहे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्वाच्या बातम्या :
पॉंटिंगने ‘या’ खेळाडूच्या पारड्यात टाकले भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी आपले मत
“आम्ही जनावरे खातो म्हणून असे आहोत” अख्तर पुन्हा बरळला
वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!