आगामी टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करणार नाही. त्याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं असून यामध्ये विश्वचषकानंतर कर्णधारवदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोहली पायउतार झाल्यानंतर नवीन कर्णधाराच्या रूपात रोहितच्या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे आणि माध्यमांतही तशी माहिती दिली जात आहे.
अशात रोहितला कर्णधार बनवण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण सध्या वय ३४ वर्ष आहे आणि त्याला कर्णधार केले गेले तरी तो जास्त काळासाठी या पदावर कायम राहू शकणार नाही. कारण संघाला एका अशा कर्णधाराची आवश्यकता आहे, जो दिर्घ काळ संघाचे नेतृत्व करू शकतो आणि संघाचे संतुलान कायम ठेवू शकतो.
सध्या भारतीय संघात रोहितव्यतिरिक्त असे काही खेळाडू आहेत, जे टी२० भविष्यात संघाचे नेतृत्व करू शकतात. या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे भविष्यात भारताच्या टी२० संघाचे कर्णधार बनू शकतात.
भारतीय संघातील तीन खेळाडू, जे भविष्यात संघाचे कर्णधार बनू शकतात
१. श्रेयस अय्यर
संघासाठी मध्यक्रमात फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर तो या यादीत पहिल्या स्थानावर आहे, जे भविष्यात टी२० संघाचे नेतृत्व करू शकतात. श्रेयस आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. त्याला प्रथम कर्णधारपदाची जबाबदारी २०१८ मध्ये दिली गेले होती आणि त्यावेळी तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता.
तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवल्यानंतर संघाचे भाग्यच बदलले. अय्यरने २०१९ मध्ये ७ वर्षांनंतर दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले होते. तसेच अय्यरच्याच नेतृत्वात दिल्ली संघ आयपीएल २०२० मध्ये पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता.
आयपीएलव्यातिरिक्त अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचेही नेतृत्व केलेले आहे. एकंदरीत पाहता अय्यरकडे संघाचे नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे. अशात बीसीसीआयने जर टी२० संघासाठी युवा कर्णधार शोधायचे ठरवले, तर श्रेयस्स अय्यर हे नाव संघाच्या कर्णधारपदासाठी योग्य ठरू शकते.
२. पृथ्वी शाॅ
मैदानात भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडणारा पृथ्वी शाॅ याचेही नाव भविष्यातील भारतीय टी२० संघाच्या कर्णधारांच्या यादीत येते. तो भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक जिकला आहे. त्यावेळी शाॅने चांगल्या नेतृत्वाचे प्रदर्शन केले होते. शाॅ कर्णधार असताना भारताच्या १९ वर्षांखालील संघाने जिंकलेल्या विश्वचषकानंतर संघाला पुन्हा एकही विश्वचषक जिंकला आलेला नाही.
नेतृत्वाव्यतिरिक्त शाॅ ज्याप्रकारे फलंदाजी करतो, ही त्याची ताकत आहे. जो फलंदाज त्याच्या चांगल्या फार्ममध्ये असतो, त्याच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता नसते आणि शाॅमध्येही तो आत्मविश्वास दिसतो. तो भविष्यात भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनण्यालायक ठरू शकतो.
३. शुभमन गिल
कर्णधार विराट आणि शुभमन गिल यांची अनेकदा तुलना केली जाते. गिल एक चांगला आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे. तो भविष्यामध्ये भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळू शकतो. त्याच्याकडे यापूर्वी भारतीय टी२० संघाच्या नेतृत्वाचा अनुभव आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी इंग्लंडचे खेळाडू सामील होणार नाहीत, अशी जेव्हा चर्चा होती. तेव्हा इयाॅन माॅर्गनच्या स्पर्धेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर संघात अनेक अनुभवी खेळाडू असूनही संघ व्यावस्थापनाने गिलचे नाव सुचवल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर माॅर्गन स्पर्धेसाठी उपस्थित झाला आणि गिलच्या नावाची चर्चा संपली. अशात येणाऱ्या काळात गिलदेखील भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदाचा दावेदार ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या टी२० विश्वचषकात अदलाबदलीची शक्यता, आयपीएल प्रदर्शनावर अवलंबून असेल ‘या’ खेळाडूंचं नशीब
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे
आयपीएलच्या उत्तरार्धात लागणार विक्रमांची रास, पाच भारतीयांसह पोलार्ड-मॉरिस ठोकणार ‘अनोखे’ शतक?