भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात रांची येथे दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. रविवारी (9 ऑक्टोबर) खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 असे आघाडीवर आहेत. अशातच भारताच्या संघात बदल झालेला आहे. दीपक चाहर दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी वॉशिंग्टन सुंदर याची संघात एंट्री झाली आहे. यामुळे दुसऱ्या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल दिसणार आहे.
भारत लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या वनडेमध्ये पाच गोलंदाजासह मैदानात उतरला होता. ज्यामध्ये कोणीही फिंगर स्पिनर नव्हता. त्याचबरोबर फलंदाजीतही कमी दिसली. अशातच वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)याला संघात घेतले तर या दोन्ही अडचणी दूर होउ शकतात. तसेच त्याला संघात घेतले तर कोणाची जागा अडचणीत येईल हा प्रश्न निर्माण होतो.
सुंदर प्लेईंग इलेवनमध्ये आला तर रवी बिश्नोई याला बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. तसेही तो मागील सामन्यात सर्वाधिक धावा दिल्या आहेत. त्याने 8 षटके टाकताना 69 धावा देत एकच विकेट घेतली. संघात दुसरा फिरकीपटू देखील आहे. कुलदीप यादव याची कामगिरी चांगली राहिली. ज्यामुळे त्याची अंतिम अकरामध्ये जागा पक्की आहे.
भारताची फलंदाजी फळी पाहिली तर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांना वगळता बाकींनी निराशा केली. करणधार शिखर धवन आणि शुबमन गिल हे तर लवकरच बाद झाले. त्यातचा कारकिर्दीतील पहिला सामना खेळणाऱ्या रुतूराज गायकवाड यानेही चांगली कामगिरी केली नाही. विकेट वाचवण्याच्या नादात इशान किशही बाद झाला. यामुळे या चौघांनाही रांचीमध्ये उत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे.
दूसरे वनडेसाठी भारताची संभावित प्लेइंग XI- शिखर धवन, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर/रवी बिश्नोई, आवेश खान, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरावाचा श्रीगणेशा! ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विराट-राहुलने गाळला घाम; तुम्हीही पाहा व्हिडिओ
उगाचच बिलियर्ड्सचा किंग म्हणत नाहीत! भारतीय पठ्ठ्याने मलेशियात पटकावले 25वे किताब, एकदा वाचाच