आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाईल. अबूधाबी, शारजाह आणि दुबई येथील स्टेडियमवर या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. यासाठी सर्व संघानी तयारी सुरू केली आहे.
दुबईच्या मैदानावर यश मिळवण्यासाठी गोलंदाज प्रयत्न करतील. तर फलंदाज चाहत्यांचे मनोरंजन करताना षटकार-चौकार मारतानाही दिसतील. टी-२० स्वरूपात खेळल्या जाणार्या या आयपीएल स्पर्धेमध्ये डेथ ओव्हरमध्ये (शेवटची काही षटके) गोलंदाजी फार महत्त्वाची असते.
यावेळी, डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांकडे विशेष लक्ष असेल. या लेखात ५ डेथ ओव्हर गोलंदाजांविषयी जाणून घेऊ जे युएईमध्ये खेळल्या जाणार्या आयपीएल २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करू शकतात.
आयपीएल २०२० मध्ये हे ५ गोलंदाज डेथ ओव्हर गोलंदाजी करून सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकतात-
१. दीपक चाहर (Deepak Chahar) – चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा गोलंदाज दीपक चाहर हा देखील डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकतो. तसे, दीपक सुरुवातीच्या षटकात चांगली गोलंदाजी करतो. नवीन चेंडू गोलंदाजी करण्यात तो माहीर आहे. परंतु यावेळी डेथ ओव्हर्समध्ये दीपककडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा केली जात आहे.
दीपक चहरने आतापर्यंत ३४ आयपीएल सामने खेळले आहेत आणि २६.५२ च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत डेथ ओव्हरमध्ये चहर फार क्वचितच गोलंदाजी करताना दिसतो. परंतु ड्वेन ब्राव्हो आणि त्याची जोडी या आयपीएलमध्ये विरोधी संघांना मोठी घातक ठरू शकते.
गेली दोन वर्षे तो चेन्नई संघातर्फे सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसला आहे त्याने बऱ्याचदा मॅच विनिंग कामगिरीही केली आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर २०१८ मध्ये जेव्हा संघ या स्पर्धेत परत आला, तेव्हा चेन्नई संघाने ही स्पर्धा जिंकली आणि यात दीपक चहरने खूप चांगला खेळ दर्शविला.
२. जोफ्रा आर्चर (Joffra Arche) – राजस्थान रॉयल्स
या यादीत राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव सुद्धा सामील आहे. जोफ्रा आर्चर डेथ ओव्हर्समध्ये विरोधी संघातील फलंदाजांना आपल्या जलद गोलंदाजी आणि अचूकटप्याने त्रास देऊ शकतो. मागील दोन आयपीएल हंगामात त्याने शेवटच्या षटकात उत्तम गोलंदाजी केली होती.
२५ वर्षीय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने २०१८ च्या हंगामापासून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून राजस्थान रॉयल्सबरोबर आहे. जोफ्राने आतापर्यंत २१ आयपीएल सामने खेळले आहेत. त्याने २३.६९ च्या सरासरीने २६ खेळाडूंना बाद केल आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/१५ होती.
आयपीएल २०२० दरम्यान डेथ ओव्हर्समध्ये तो राजस्थानसाठी खूपच उपयुक्त गोलंदाज ठरू शकते. त्याचा गोलंदाजीचा वेग हे याचे सर्वात मोठे कारण असू शकते. जोफ्रा आर्चरसमोरच्या गोलंदाजी समोर सर्वोत्तम फलंदाजाला गुडघे टेकतात.
३. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) – सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सुद्धा डेथ ओव्हर्स मध्ये आपली चांगली कामगिरी करू शकतो. भुवनेश्वर हा आयपीएलमचे बरेच हंगाम सनरायझर्स हैदराबाद कडून खेळत आहे आणि तो संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज देखील आहे. त्यामुळे डेथ ओव्हर्समधील विरोधी संघाच्या धावांवर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांच्या खांद्यावर राहील.
भुवीची स्विंग गोलंदाजी समोरच्या संघासाठी समस्या बनू शकते. आयपीएल २०१६ आणि २०१७ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स मिळाल्याबद्दलही त्याला पर्पल कॅप देण्यात आली होती.
आयपीएलमधील आतापर्यंतच्या ११७ सामन्यात २३.७१ च्या सरासरीने त्याने १३३ बळी घेतले आहेत. भुवनेश्वर कुमारची आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ५/१९ आहे.
४. शेल्डन कॉटरेल (Sheldon Cottrell) – किंग्ज इलेव्हन पंजाब
या यादीत वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या शेल्डन कॉटरेलचेही नाव आहे. आयपीएलच्या लिलावादरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने शेल्डनला ८.५० कोटी मध्ये विकत घेतले होते. तसेच हा त्याचा आयपीएलचा पहिलाच हंगाम असेल.
स्वतः कॉटरेलने आपल्या बर्याच विधानांमध्ये असे म्हटले आहे की, आयपीएल २०२० मध्ये पंजाब संघातून खेळण्यास तो खूप उत्सुक आहे. या आयपीएल हंगामात शेल्डन कॉटरेल डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी चांगली कामगिरी बजावू शकतो. तसे, पंजाब संघाकडे मोहम्मद शमी, मुजीब उर रेहमान असे गोलंदाज आहेत पण अंतिम षटकांसाठी शेल्डनही महत्त्वाचा गोलंदाज ठरु शकतो.
ह्या ३० वर्षीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ८८ टी-२० सामने खेळले असून १९.१ ५ च्या सरासरीने १२३ बळी मिळवले आहेत. त्याला या रूपात गोलंदाजीची करायला आवडते. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ४/२० अशी आहे.
५. नवदीप सैनी (Navdeep Saini) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. नवदीप वर्ष २०१८ पासून आरसीबीसोबत आहे, पण गेल्या वर्षीच त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
या युवा वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०१९ मध्ये १३ सामने खेळले आणि ३६.०९ च्या सरासरीने ११ विकेट्स नोंदविला. सैनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अफाट वेग. तो १४० किमी / तासाच्या वेगाने सतत गोलंदाजी करू शकतो.
गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यात डेथ ओव्हर मध्ये नवदीपने शानदार गोलंदाजी केली. युएईच्या मैदानावर त्याच्या अनुभवाचा चांगला उपयोग होऊ शकेल. सैनीचा वेग त्याच्यासाठी आणि संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन
महत्त्वाच्या बातम्या –
यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
आयपीएल २०२० खेळणार नाही, सर्वाधिक चर्चेत असलेला मिचेल स्टार्क, न खेळण्याचे…
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने