मागच्या वर्षी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला चालू आयपीएल हंगामात अद्याप अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाहीये. परंतु त्याच्या अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल मात्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. रसेल त्याच्या दमदार शॉट्ससाठी ओळखला जातो. चालू हंगामात देखील त्याने असे काही शॉट्स खेळून दाखवले आहेत. फ्रँचायझीने आता त्याच्या अशाच एका शॉटचा व्हिडिओ शेअर केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) फ्रँचाझीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून आंद्रे रसेल (Andre Russell) याने मारलेल्या एका दमदार शॉटचा व्हिडिओ शेअर केला आहे. रसेलने केकेआरच्या सराव सत्रात मारलेल्या फटक्यामुळे मैदानात ठेवलेली एक खुर्ची तुटल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फ्रँचायझीने लिहिले की, “मसल रसेलने पाडलेल्या प्रभावासाठी शेवटपर्यंत वाट पाहा.” व्हिडिओच्या शेवटी खुर्चीच्या मध्ये चेंडूमुळे छिद्र पडल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CcxwzbcFgyr/?utm_source=ig_web_copy_link
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चालू हंगामातील रसेलच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर तो केकेआर फ्रँचायझीसाठी फायदेशीर ठरत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात डावांमध्ये १८०.१५च्या सरासरीने आणि ४५.४०च्या स्ट्राईक रेटने २२७ धावा केल्या आहेत.
केकेआरसाठी आयपीएल २०२२मधील इथपर्यंचा प्रवास तसा पाहिला, तर खडतर राहिला आहे. त्यांना खेळलेल्या हंगामातील सुरुवातीच्या ८ सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. उरलेल्या ५ सामन्यांमध्ये संघाला पराभव मिळाला आहे. गुणतालिकेत त्यांचा संघ ६ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.
मागच्या चार सामन्यांमध्ये केकेआरला लागोपाठ पराभव मिळत आहे आणि संघाचा प्रयत्न हाच आहे की, लवकरात लवकर पुन्हा विजयीपथावर परतावे. त्यांचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. हंगामातील हा ४१वा सामना असून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर २८ एप्रिलला तो खेळला जाईल.
आयपीएलच्या इतिहासात दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाला मागच्या हंगामात देखील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. परंतु शेवटच्या टप्प्यातील सामन्यांमध्ये संघाचे चांगले प्रदर्शन करून अंतिम सामना गाठला होता. अंतिम सामन्यात मात्र सीएसकेने त्यांना मात दिली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी नसणार बायो-बबल? या खेळाडूंना विश्रांती मिळण्याचीही शक्यता
रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी…’
खरंच भाऊ-भाऊ आहेत का ऋषी अन् शिखर धवन? वाचा काय आहे नेमकं त्यांचं नातं