आयपीएलला क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखले जाते. अनेक युवा खेळाडू, आंतराष्ट्रीय खेळाडू या लीगमध्ये खेळतात व उत्कृष्ट असे प्रदर्शन ही करतात. आयपीएलमध्ये चाहत्यांसोबत खेळाडूही खूप उत्सुकतेने खेळतात. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपला उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जल्लोष करतात.
आपण आतापर्यंत क्रिकेट विश्वात अनेक खेळाडूंना विकेट घेतल्यानंतर किंवा शतक मारल्यानंतर आपापल्या अंदाज मध्ये जल्लोष साजरे करताना पहिले आहे. त्यातही आपले पहिले शतक किंवा विकेट असल्यास खेळाडूंचा उत्साह हा दुप्पट असतो. मात्र न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोधीने आयपीएलमध्ये आपली पहिली विकेट घेतल्यानंतर कुठलाही जल्लोष केला नव्हता. जे नक्कीच आश्चर्यकारक होते. मात्र नुकतेच त्याने यामागचे कारण उलगडले.
न्यूझीलंडचा फिरकीपट ईश सोधीने एका मुलाखातीत आपल्या पहिल्या आयपीएल विकेटबद्दल भाष्य केले. ईश सोधी हा राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये खेळताना त्याची पहिली विकेट ही केन विल्यम्सनच्या रूपात त्याला मिळाली होती. केन विल्यम्सन हा न्यूझीलंड संघाचा कर्णधार आहे. म्हणूनच ईश सोधीने आपली पहिली आयपीएल विकेट घेतल्यानंतर देखील जल्लोष केला नव्हता.
साल २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात ईश सोधीने आपल्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार केन विलियम्सन याला झेलबाद करून पॅव्हेलियन मध्ये पाठवले. ही त्याची पहिला आयपीएल विकेट होती. पण त्या विकेटनंतर तो आनंदी दिसला नाही. याचे कारण त्याने असे सांगितले की, “केन विलियम्सन हा खूप पूर्वीपासून माझा कर्णधार आहे आणि मी खूप काळापासून त्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यामुळे त्या विकेटनंतर मी शांत राहिलो.”
ईश सोधीने विनोद करत सांगितले की, “माझ्याकडे त्यावेळेस तीन पर्याय होते. मला पंजाबीही बोलता येते. मी इंग्रजी तर बोलतच असतो आणि तिसरा म्हणजे चूप राहायचे. तर त्यावेळी मला तिसरा पर्याय आवडला. म्हणून मी जल्लोष केला नाही. आम्ही सामना जरी हरलो असलो तरीही केन विलियम्सनची विकेट ही माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण होती.” ईश सोधीने यावेळी आपला कर्णधार केन विलियम्सनची देखील प्रशंसा केली. त्याने सांगितले, “केन हा खूप शांत स्वभावाचा आहे. तो मैदानावरही असाच शांत राहतो. त्याचे व्यक्तिमत्व तसेच आहे. तुम्ही त्याला जेव्हा ही बघाल तो तसाच असतो.”
महत्वाच्या बातम्या
इंग्लंडचा सैरसपाटा वा अजून काही! कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर विराटसेनेला मिळणार ‘मोठी’ सूट
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून
टी१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचा कहर विक्रम, अवघ्या २८ चेंडूत झळकावले तूफानी शतक