युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याने प्रत्येक जण हैराण झाला आहे. अशातच किशनने द्विशतक ठोकल्यावर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक उत्तम मजूमदार यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की बऱ्याच वर्षांआधी एमएस धोनी ईशान किशन याच्याबद्दल काय म्हणाला होता.
ईशान किशन याच्या बद्दल एमएस धोनी याने केले होते मोठे विधान
ईशान किशन (Ishan Kishan) याचे लहाणपणीचे प्रशिक्षक उत्तम मजूमदार यांनी त्याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा केला आहे. खुलासा करत त्यांनी सांगितले की एमएस धोनी (MS Dhoni) धोनी किशन बद्दल बऱ्याच वर्षांआधी काय म्हणाला होता. ते म्हणालेे की, “ईशान किशन याच्या पदार्पणाआधी धोनी म्हणाला होता की जर ईशान सारखी गुणवत्ता असलेला खेळाडू जर भारतासाठी जास्त काळासाठी नाही खेळला तर तो स्वत: आपल्या प्रतिष्ठेसोबत अन्याय करेल. ईशान किशनचा मोठा भाऊ राज किशन हा देखील चांगला क्रिकेटर होता. मात्र त्याच्या आई-वडीलांनी निर्णय घेतला होतला की, एक मुलगा क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवेल तर दुसरा मुलगा शैक्षणिक क्षेत्रात काम करेल. मोठा भाऊ असल्याने राजला आपल्या त्याग करावा लागला आणि त्याने वैद्यकीय पदवी घेतली.”
ईशान किशन याने बांगलादेश विरुद्ध चट्टोग्राम येथे खेळल्या गेेलेल्या सामन्यात 210 धावा केल्या होत्या. त्याने 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 210 धावांची झुंजार खेळी केली आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अशी खेळी करणारा जगात सातवा आणि भारतात चौथा फलंदाज बनला. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) या खेळाडूंनी द्विशतक झळकावले होते. आता ईशान किशन याचे देखील नाव द्विशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत जोडले गेले आहे. आता त्याच्या नावाचा समावेश विक्रमाच्या यादीत झाला आहे.(Ishan kishan’s coach disclosed the statement of MS Dhoni few years ago about him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! पत्नी विधानसभा सदस्य बनताच जडेजाने सुरू केली पैशांची उधळण
मयंकच्या घरात पडले ‘नन्हे कदम’! पत्नीने दिला गोंडस मुलाला जन्म