Jitesh Sharma Engagement: भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अलीकडेच दीपक हुड्डा, चेतन सकारिया, शाहबाज अहमद यांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. आता पंजाब किंग्जचा खेळाडू आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माही लग्नगाठीत अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने त्याच्या भावी पत्नीसोबतच्या साखरपुड्याचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे, जितेशची होणारी पत्नी पंजाब किंग्जची फॅन गर्ल राहिली आहे. अलीकडे, आयपीएल 2024 दरम्यान, जितेशची भावी पत्नी पंजाबच्या जर्सीमध्ये चीअर करताना दिसली होती. तिचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून आपले पंजाब किंग्जच्या जर्सीतील फोटो शेअऱ केले होते. एवढेच नाही तर जितेशने या फोटोंवर हार्ट इमोजीने कमेंटही केली होती. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, “फॅन गर्ल मोमेंट.”
View this post on Instagram
जितेश आणि शलाका आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते
जितेश शर्माच्या भावी पत्नीचे नाव शलाका मकेश्वर आहे. ती इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिचे फक्त 1271 फॉलोअर्स आहेत पण त्यापैकी एक भारतीय क्रिकेटर जितेश आहे. जितेश अनेकदा शलाकाच्या पोस्ट कमेंट किंवा शेअर करतो. जितेशने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून शलाकासोबतचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान जितेश शर्माने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. ऋतुराज गायकवाड या संघाचा कर्णधार होता. तेव्हापासून त्याने एकूण 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर 100 धावा आहेत. तो यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने या वर्षी जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. याशिवाय तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा भाग आहे. शिखर धवनला दुखापत झाल्यावर 2024 मध्ये त्याने संघाचे कर्णधारपदही सांभाळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय अष्टपैलू शाहबाज अहमद गुपचूप चढला बोहल्यावर, हातात बॅट घेऊन नवरदेवाने वेधले लक्ष
नीरज चोप्राला हर्नियाचा त्रास, लवकरच करणार शस्त्रक्रिया! कोचिंग स्टाफमध्येही होणार मोठे बदल
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत किती एकदिवसीय सामने खेळणार? जाणून घ्या एका क्लिकवर