fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कबड्डीपटू जिवा कुमार गरिबांच्या मदतीला आला धावून…

कोरोना वायरसमुळे जगात थैमान मांडला आहे. आपल्या देशातही २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊन मुळे गरीब जनतेला मोठा प्रश्न पडला आहे, रोज गमावून खाणाऱ्या ह्या लोकांना कोणताही रोजगार नसल्याने जेवणही मिळत नाही. अश्याच गरीब लोकांसाठी खेळाडु पुढे येऊन त्यांना अन्नधान्य पुरवत आहेत.

कबड्डीपटु जीवा कुमार ने गरीब लोकांना राशन धान्य देउन मदत केली. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू जीवा कुमार कन्याकुमारीचा आहे. जिवा कुमार कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. लॉकडाऊन दरम्यान जिवाने गरीब लोकांना रेशन धान्य दिले.

जीव कुमारने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जीवा कुमार प्रो कबड्डी हंगाम 2 विजेता यू मुंबा आणि हंगाम 7 विजेत्या बंगाल वॉरियर्स संघाचा भाग आहे. तसेच २०१० एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे.

You might also like