कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वर्षातील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. फलंदाजांसाठी पोषक असलेल्या या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी यथेच्छ फलंदाजी केली. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन याने नेतृत्व सोडल्यानंतर आपल्या पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत नाबाद द्विशतक झळकावले. त्याच्या या द्विशतकाने न्यूझीलंडने या सामन्यावर आपली पकड बनवली आहे.
दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 438 धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने 161 तर युवा सलमान आगा यानेही शतक साजरे केले. या धावांचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे व टॉम लॅथम यांनी 185 धावांची भागीदारी केली. कॉनवेने 92 तर लॅथमने शतक साजरे केले.
मात्र, न्यूझीलंडच्या डावाचे वैशिष्ट्य राहिले अनुभवी केन विलियम्सन याची फलंदाजी राहिली. कर्णधारपद सोडल्यानंतर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या केन विलियम्सन याची सुरुवात या डावात आश्वासक नव्हती. त्याला 21 धावांवर यष्टिचितच्या रूपाने सोपे जीवदान मिळाले. या जीवनाचा फायदा त्याने घेतला. तिसऱ्या दिवसाखेर टिच्चून फलंदाजी करताना त्याने आपले 25 वे शतक पूर्ण केले. त्याने तब्बल 722 दिवसानंतर हे शतक झळकावले.
चौथ्या दिवशी 105 धावांवरून पुढे खेळताना विलियम्सनने ईश सोढीसह डाव पुढे नेला. सोढीने कारकिर्दीत प्रथमच अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. सोढी 65 धावांवर परतल्यानंतर केनने आक्रमक खेळ दाखवत स्वतःचे पाचवे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर न्यूझीलंडने आपला डाव घोषित केला. केनच्या द्विशतकामूळे न्यूझीलंडला 175 धावांची आघाडी मिळवली. विशेष म्हणजे केन याने आपली अखेरची तीनही शतके पाकिस्तानविरुद्ध झळकावली आहेत.
(Kane Williamson Double Ton Helps Newzealand In Karachi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
सूर्यासाठी वर्षाचा शेवट गोड! भारताच्या टी20 उपकर्णधार पदानंतर मिळाले आयसीसी पुरस्काराचे नामांकन