मंगळवारी(१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात पराभूत करुन पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. हे विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डने त्याचा वेस्ट इंडिज संघातील सहाकारी आणि चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोला एक खास संदेश दिला आहे.
आयपीएल २०२० चे विजेतेपद मुंबईने जिंकल्याने आता पोलार्डच्या नावावर सर्वाधिक १५ टी२० विजेतेपदांची नोंद झाली आहे. सर्वाधिक टी२० विजेतेपद मिळवण्याच्या यादीत त्याने ड्वेन ब्रावोला मागे टाकले आहे. ब्रावोच्या नावावर १४ विजेतेपदांची नोंद आहे.
याच गोष्टीचा संदर्भ देत पोलार्डने मंगळवारी म्हटले की ‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे आहेस, हे मला आता कॅमेरात सांगावेच लागेल.’
पोलार्ड आणि ब्रावो हे दोघेही चांगले मित्र आहेत. तसेच ते जेव्हा विविध लीग स्पर्धेत वेगवेगळ्या संघाकडून एकमेकांविरुद्ध उभे राहातात तेव्हा गमतीने ते एकमेकांना चिडवत असतात.
ब्रावोमुळे पोलार्ड मुंबई संघात –
विशेष म्हणजे ज्यावेळी ड्वेन ब्रावो आयपीएलमध्ये सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, तेव्हा त्याने मुंबई इंडियन्स मालकांना पोलार्डला संघात घ्या म्हणून सुचवले होते. त्याचा हा सल्ला मुंबईने ऐकला आणि मुंबईला एक तडाखेबंद अष्टपैलू क्रिकेटपटू मिळाला. २०१० पासून पोलार्ड मुंबईकडून खेळत असून त्याने आयपीएलमध्ये मुंबईकडून सर्वाधिक सामनेही खेळले आहेत. त्याने मुंबईकडून ३००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ दोन युवा भारतीय क्रिकेटर्सचा फॅन झाला ब्रेट ली; म्हणाला…
कसोटीत ११ देशांत शतक करणारा जगातील एकमेव क्रिकेटर झाला पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक
भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
ट्रेंडिंग लेख –
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान