आयपीएल 2023 च्या 21व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्स संघ समोरासमोर आले. पंजाबच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत आक्रमक फलंदाजांनी सजलेल्या लखनऊ सुपरजायंट्सला 159 पर्यंत रोखले. लखनऊ संघासाठी कर्णधार केएल राहुल याने अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याच्या नावे आयपीएल इतिहासातील एक मोठा विक्रम देखील जमा झाला.
🚨 Milestone 🚨
4⃣0⃣0⃣0⃣ runs and counting for @klrahul in #TATAIPL 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/OHcd6Vf5zU #LSGvPBKS pic.twitter.com/NWXTyJbLm0
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर लखनऊ संघाला राहुल व मायर्स या जोडीने वेगवान सुरुवात केली. इतर फलंदाज नियमित अंतराने बाद झाल्यानंतरही राहुल एका बाजूने मैदानावर उभा राहिला. पहिल्या चार सामन्यात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मात्र, या सामन्यात त्याने हे अपयश धुवून काढले. राहुलने बाद होण्यापूर्वी 56 चेंडूवर 8 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या.
या खेळी दरम्यान त्याने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान 4000 धावा देखील पूर्ण केल्या. राहुलने हा मैलाचा दगड केवळ 105 डावांमध्ये पार केला. त्याने या यादीमध्ये दिग्गज ख्रिस गेल याला पाठीमागे सोडले. गेलने 4000 आयपीएल धावा करण्यासाठी 112 डाव खेळले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून, त्याने 114 डावांमध्ये हा कारनामा केलेला. त्यानंतर आरसीबीचे दिग्गज म्हटल्या जाणाऱ्या विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी अनुक्रमे 128 व 131 डाव 4000 आयपीएल धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये राहुलची सरासरी सर्वोत्तम आहे. राहुलने या धावा करताना 47.06 अशी सर्वोत्तम सरासरी राखली.
राहुलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स व लखनऊ सुपरजायंट्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
(KL Rahul Becomes Fastest Batter Who Score 4000 Runs In IPL Pass Chris Gayle)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेवर होणार नारीशक्तीचा जागर! WPL जर्सी आणि हरमन दिसणार टॉसला, मुंबई इंडियन्सचा कौतुकास्पद उपक्रम
युवा करन ठरला पंजाबचा 15 वा कर्णधार! दिग्गजांनी वाहिलीये नेतृत्वाची धुरा, वाचा यादी