मे महिन्यात कोरोना संक्रमाणामुळे इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले होते. मात्र, आता या हंगामाचे उर्वरित सामन्यांना येत्या रविवारपासून (१९ सप्टेंबर) युएईमध्ये सुरुवात होत आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याबद्दल अनेकांनी विविध मतं व्यक्त केली आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरचाही समावेश आहे.
गंभीरने म्हटले आहे की पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएलमध्ये ४० चेंडूत शतक करु शकतो. तसं टी२० क्रिकेटमध्ये शतक करणे सोपी गोष्ट नाही. आत्तापर्यंत काही मोजके खेळाडूच या प्रकारात शतकी खेळी करु शकले आहेत. यात अनेक भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू म्हणून युसूफ पठाणच्या नावावर विक्रम आहे. त्याने २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक केले होते.
गंभीर स्टार स्पोर्स्टच्या गेम प्लॅन कार्यक्रमात बोलताना म्हणाला, ‘जर कोणत्याही फलंदाजाकडे वेगवान स्ट्राईक रेटने खेळण्याची क्षमता नसेल तर तुम्ही समजू शकता की त्याला अँकरची भूमिका निभवावी लागले. पण केएल राहुलकडे क्षमका आहे की तो ४० चेंडूत शतक ठोकू शकतो आणि तुम्हाला असे वाटत नाही का त्याने अशी कामगिरी करावी.’ राहुलने यापूर्वी आयपीएल २०२० हंगामात ६२ चेंडूत १३२ धावांची खेळी केली होती.
गंभीर असेही म्हटला की केएल राहुलकडून सर्वोत्तम प्रदर्शन होणे अजून बाकी आहे. तो म्हणाला, ‘आपण अजून केएल राहुलचे सर्वोत्तम प्रदर्शन पाहिलेले नाही. त्याने धावा केल्या आहेत. पण अजून हे पाहिले नाही की तो फलंदाजी अजून काय मिळवू शकतो. तो एक चांगला हंगाम खेळू शकतो, जसा कधी विराट कोहलीने खेळला होता. तो मर्यादीत षटकांचा असा क्रिकेटपटू आहे, जो एका मोसमात चांगल्या स्ट्राईकरेटने दोन-तीन शतकं करु शकतो.’
केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी त्याने ७ सामन्यात ६६.२० च्या सरासरीने ३३१ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश आहे. असे असले तरी, सध्या पंजाब किंग्स मात्र संघर्ष करत आहे. आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत पंजाब किंग्स सध्या ८ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकून ६ व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ‘मिस्टर ३६०’चा नेटमध्येही दिसला आक्रमक अंदाज, नेटमध्ये डिव्हिलियर्सने मारले हवाई फटके
विराटशी कोणतीही गोष्ट बोलताना डिव्हिलियर्सला वाटते भीती, कारण जाणून व्हाल चकीत