भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून शानदार विजय मिळवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा पहिला डाव 46 धावांवर आटोपला होता. याच डावात केएल राहुल (KL Rahul) शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातही राहुलला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुणे कसोटीत त्याची संघातून सुट्टी होऊ शकते.
केएल राहुलच (KL Rahul) नाही तर फिरकीपटू कुलदीप यादवलाही (Kuldeep Yadav) न्यूझीलंडविरुद्धच्या पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून वगळले जाऊ शकते. बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात कुलदीपने 3 विकेट्स घेतल्या होत्या. असे असले तरी खेळपट्टी लक्षात घेता रोहित शर्मा (Rohit Sharma) कुलदीपच्या जागी आकाश दीपला (Akash Deep) तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतो.
न्यूझीलंविरूद्धच्या पहिल्या कसोटीत केएल राहुल (KL Rahul) पूर्णपणे फ्लाॅप ठरला. तो पहिल्या डावात शून्यावर बाद होऊन तंबूत परतला, तर दुसऱ्या डावात 12 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे केएल राहुलला न्यूझीलंविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतून वगळले जाऊ शकते.
भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बेंगळुरूमधील पहिल्या कसोटीनंतर आता मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना (24 ते 28 ऑक्टोबर) दरम्यान खेळला जाणार आहे, तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, दुखापतीनंतर परतला अत्यंत महत्त्वाचा खेळाडू
IND vs NZ; “आम्ही जोरदार पुनरागमन…” पराभवानंतर स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा RUN-OUT होणारे टाॅप-5 खेळाडू