इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ३ गडी राखून पराभूत केले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. परंतु १८ व्या षटकात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून एक मोठी चूक झाली, ज्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघासमोर १३७ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची जोडी मैदानावर आली होती. या दोघांना संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले होते. शिखर धवनने या डावात ३९ तर पृथ्वी शॉने १८ धावांचे योगदान दिले होते. निर्णायक क्षणी शिमरोन हेटमायरने येऊन १८ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने २८ धावांची खेळी केली आणि शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.
एक चूक पडली महागात
क्रिकेटमध्ये झेल टिपणे अतिशय महत्वाचे असते. ते म्हणतात ना कॅचेस विन्स मॅचेस. परंतु सामना निर्णायक क्षणी असताना जेव्हा क्षेत्ररक्षक एक छोटी चूक करतो, ती चूक संपूर्ण संघाला महागात पडते. तर झाले असे की, १८ चेंडूंमध्ये दिल्लीला विजयासाठी २८ धावांची आवश्यकता असताना धोनीने १८ वे षटक टाकण्याची जबाबदारी ड्वेन ब्रावोला दिली होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूंवर हेटमायरने चौकार मारले होते. त्यानंतर तिसरा चेंडू ड्वेन ब्रावोने फुल टॉस टाकला होता, ज्यावर हेटमायरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.
Delhi Capitals defeats CSK. What a game we had, CSK made a great comeback, but a costly drop from Krishnappa Gowtham made it difficult for CSK. pic.twitter.com/6PHk80DLWJ
— SPREAD.DHONISM 🦁™ (@Spreaddhonism7) October 4, 2021
https://twitter.com/ambuj_jii/status/1445084031465394184?s=20
परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या कृष्णप्पा गौतमच्या हातात गेला. परंतु त्याला हा झेल टिपता आली नाही. त्यामुळे या चेंडूवर देखील दिल्ली कॅपिटल्स संघाला ४ धावा मिळाल्या. याच गौतमला चेन्नई संघाने यावर्षी ९.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई वि. राजस्थानमध्ये ‘करा वा मरा’ मुकाबला, प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्याची शेवटची संधी
मुंबई वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
चुरशीच्या लढतीनंतरही पराभूत झाल्याने सीएसकेच्या ताफ्यात निराशेची लहर, धोनी अन् रैनाची पत्नी तर…