श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकांसाठी तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ७ जून ते ८ जुलैदरम्यान श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात २ सामन्यांची कसोटी मालिका, ५ सामन्यांची वनडे मालिका आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकांसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला संघाचा गोलंदाजी स्ट्रॅटजी प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. हाच मलिंगा आता श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याला धडे देताना दिसला आहे.
श्रीलंकेचा (Sri Lanka) युवा गोलंदाज पथिरानाची (Matheesha Pathirana) गोलंदाजी ऍक्शन हुबेहूब मलिंगासारखी आहे. याच कारणामुळे त्याला ‘बेबी मलिंगा‘ (Baby Malinga) असे संबोधले जाते. याच ‘बेबी मलिंगा’ अर्थात पथिरानाला मलिंगा गोलंदाजीचे प्रशिक्षण देत (Lasith Malinga Training Matheesha Pathirana) आहे. फोटोंमध्ये दिसते की, मलिंगा पथिरानाचा हात पकडून त्याला चेंडू कसा पकडावा? तो कसा फेकावा? या गोष्टी सांगत आहे. त्यांचे सराव सत्रातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Matheesha Pathirana training with Malinga for Srilankan team. 🦁💥#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/hPP3qxxFDz
— Jersey NO:7 (@fanof07) June 4, 2022
Matheesha Pathirana training with Malinga for Srilankan team. 🦁💥#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/8d2QfYlrRr
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) June 4, 2022
पथिरानाने आयपीएलमधील प्रदर्शनाने केले प्रभावित
आयपीएल २०२२ मध्ये पथिराना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. त्याने चेन्नईकडून आयपीएलमध्ये २ सामने खेळताना २ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या यॉर्कर चेंडूंनी चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी यालाही प्रभावित केले होते. तो पुढील वर्षी चेन्नई संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरेल, असेही धोनीने त्याचे कौतुक करताना म्हटले होते.
https://twitter.com/KeshavMishraG/status/1533074324461977600?s=20&t=uEtnwZJkXDcrJGG93fmoYw
Slinga Malinga sharing his wealth of experience with the two rookie slingers – Matheesha Pathirana and Nuwan Thushara during training ahead of the #SLvAUS T20I series at Khettarama.@ThePapareSports @ninety9sl @matheesha_9 @OfficialSLC pic.twitter.com/NAiczdyHar
— Damith Weerasinghe (@Damith1994) June 4, 2022
पथिराना करू शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
१९ वर्षीय पथिराना आयपीएलमधील त्याच्या प्रभावी प्रदर्शनानंतर श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय संघात जागा बनवण्यात यशस्वी ठरला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांदरम्यान त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधीही मिळू शकते. त्याने आतापर्यंत देशांतर्गत पातळीवर १ अ दर्जाचा सामना आणि ५ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान टी२० क्रिकेटमध्ये त्याने ४ विकेट्सही घेतल्या आहेत. आता मलिंगाच्या देखरेखीखाली पथिरानाला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, ज्याचा फायदा त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना होईल.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?