पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत ओम साई क्रिकेट अकादमी संघाने चंद्रोज क्रिकेट अकादमी संघाचा तर परंडवाल संघाने अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अर्णव कदमच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर ओम साई क्रिकेट अकादमी संघाने चंद्रोज क्रिकेट अकादमी संघाचा 128 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अर्णव कदमच्या 25, भाविका अहिरेच्या 23, साई गुंजाळच्या 22 तर यश सराळच्या 19 धावांसह ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 6 गडी गमावत 150 धावा केल्या. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अथर्व कुलकर्णी, अर्णव कदम व अर्चित कुर्हेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे चंद्रोज क्रिकेट अकादमी संघ केवळ 7.4 षटकात सर्वबाद 22 धावांत गारद झाला. अथर्व कुलकर्णीने 6 धावात 4, अर्णव कदमने 11 धावात 3 तर अर्चित कुर्हेकरने केवळ एका धावेत 2 गडी बाद करून संघाला मोठा विजय मिळवून दिला. अर्णव कदम सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत आर्यन गोपाळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर परंडवाल संघाने अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा 45 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अरिहंत मानेच्या 31, आर्यन गोपाळेच्या 21 तर निकिता सिंगच्या 18 धावांसह परंडवाल संघाने 20 षटकात 7 बाद 130 धावा केल्या. 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यश सुर्यवंशी , वेदांत जाधव व अयुष येलवंडे अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लब संघ 15.4 षटकात सर्वबाद 85 धावांत गारद झाला. आर्यन गोपाळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी
ओम साई क्रिकेट अकादमी- 20 षटकात 6 बाद 150 धावा(अर्णव कदम 25(21), भाविका अहिरे 23(30,2×4), साई गुंजाळ 22(15, 2×4), यश सराळ 19(35, 2×4) शामल चौगुले 1-16), अमन शेख 1-22) वि.वि चंद्रोज क्रिकेट अकादमी- 7.4 षटकात सर्वबाद 22 धावा(दिप पाटील 8(8, 1×4), अथर्व कुलकर्णी 4-6, अर्णव कदम 3-11, अर्चित कुर्हेकर 2-1) सामनावीर- अर्णव कदम
ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 128 धावांनी सामना जिंकला.
परंडवाल- 20 षटकात 7 बाद 130 धावा(अरिहंत माने 31(29, 5×4), आर्यन गोपाळे 21(35, 3×4), निकिता सिंग 18(18, 3×4), ऍरॉन गायकवाड 2-12, अदित्य जैस्वाल 2-26) वि.वि अजिंक्य क्रिकेट क्लब- 15.4 षटकात सर्वबाद 85 धावा(श्रावण शिंदे 13(20, 1×4), वेदांत अरूतवार 12(23), यश सुर्यवंशी 2-11, वेदांत जाधव 2-16, अयुष येलवंडे 2-10) सामनावीर- आर्यन गोपाळे
परंडवाल संघाने 45 धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
वरिष्ठ आणि खुली राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरला ब्राँझपदक
एटीके विजयी लय कायम राखणार? ओदिशा एफसीविरूद्ध महत्त्वपूर्ण लढत
भारताविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकन कर्णधारच म्हणतोय, ‘सामना जिंकण्याचा योग्य मार्ग कोणता…’