भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022 चा (Asia Cup 2022) दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे रंगणार आहे. आशिया चषकातील या बहुप्रतिक्षित सामन्याद्वारे तब्बल 10 महिन्यांनंतर हे दोन्ही देश आमने सामने येणार आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये टी२० विश्वचषकादरम्यान भारत-पाकिस्तान लढत झाली होती, ज्यामध्ये भारताला 10 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी याच पराभवाचा हिशोब बरोबर करण्यासाठी रोहित शर्मा आणि संघ मैदानात उतरेल.
हा सामना टिव्हीवर आणि मोबाईलवर कुठे लाईव्ह पाहता येईल?, तसेच या सामन्यासाठी दोन्ही संघ कसे असतील?, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया…
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान
तारीख आणि वेळ: रविवार 28 ऑगस्ट, संध्याकाळी 7.30 वाजता
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल
भारत आणि पाकिस्तानचे संघ-
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर
पाकिस्तान – बाबर आजम (कर्णधार), फखर जमान, हैदर अली, खुशदिल शाह, मोहम्मद रिजवान, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, हारिस रऊफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.
भारत आणि पाकिस्तानचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन/आवेश खान, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सावधान! ‘महामुकाबल्या’पूर्वी रोहितची ताकद दुप्पट, बडा दिग्गज भारतीय संघात सामील
भारताचा स्टार अष्टपैलू आता सिनेसृष्टीत करतोय पदार्पण! चित्रपटाचा ट्रेलर पाहून सुरेश रैना झाला फॅन
आशिया चषकात भारत दुसऱ्यांदा करणार विजेतेपदाची हॅट्रिक! ८ वर्षात नाही पाहिले पराभवाचे तोंड