भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी२० सामना शनिवारी (०६ ऑगस्ट) झाला असून भारतीय संघाने ५९ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. येत्या आशिया चषक आणि टी२० विश्वचषकाच्या तयारींच्या दृष्टीने भारतीय संघ या मालिकेत वेगवेगळे प्रयोग करून पाहात आहे. मात्र मालिकेतील चार सामने संपले, तरीही कर्णधार रोहित शर्माने अद्याप एका गोलंदाजाला संधी दिली नाहीय.
हा गोलंदाज आहे, चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav). दीर्घ काळानंतर कुलदीपचे भारतीय टी२० संघात पुनरागमन (Comeback In Indian T20I) झाले होते. परंतु त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा (Playing Xi) भाग बनता आले नाही.
आयपीएल २०२२ नंतर कुलदीपने भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याला भारतीय संघात निवडले गेले होते. परंतु दुखापतीमुळे तो एकही सामना न खेळता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे प्रदर्शन कौतुकास्पद राहिले होते. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना १४ सामन्यात ८.४४ च्या इकोनॉमी रेटने २१ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र या प्रदर्शनानंतर शानदार फॉर्ममध्ये असूनही कुलदीप भारतीय संघाकडून खेळण्याच्या एका संधीच्या शोधात आहे.
कुलदीप भारतीय संघाकडून तिन्ही क्रिकेट स्वरूपातून खेळला आहे. त्याने आतापर्यंत ७ कसोटी, ६६ वनडे आणि २४ टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान त्याने चांगल्या विकेट्सही घेतल्या आहेत. ७ कसोटी सामन्यात २६ विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. तर ६६ वनडे सामन्यात १०९ विकेट्सच्या त्याच्या नावावर नोंद आहे. २४ टी२० सामन्यातही त्याला ४१ विकेट्स घेता आल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvWI: विडींजला पराभवासह करावा लागणार शेवट! घातक भारतीय गोलंदाज म्हणतोय, ‘मी पुढील मॅच…’
सूर्यकुमारच्या फटक्याने चाहत्यांना झाली थेट धोनीची आठवण! पाहा धमाकेदार हॅलिकॉप्टर शॉट
उगाचच पंतला म्हणत नाही टॉपचा विकेटकिपर! ‘हा’ मोठा पराक्रम करत कार्तिकला टाकले बरेच मागे