महाराष्ट्र क्रिकेट वर्तुळात सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीग ची जोरदार चर्चा आहे. असे असतानाच महाराष्ट्र क्रिकेट मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. वयोगट स्पर्धेत वय लपवल्याच्या आरोपाखाली एका युवा क्रिकेटपटूला चक्क अटक करण्यात आली. तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.
सदर घटना शनिवारी (4 जून) रोजी घडली. माळेगाव येथील युवा क्रिकेटपटू अमोल कोळपे याला बारामती पोलिसांनी अटक केली. जानेवारी महिन्यात एमसीएतर्फे आयोजित केलेल्या अंडर 19 आमंत्रित संघाच्या क्रिकेट स्पर्धेत त्याने आपले वय लपवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
सदर स्पर्धेसाठी अमोल याने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्याची जन्मतारीख 28 सप्टेंबर 2007 अशी सांगण्यात आली होती. मात्र, त्याची काही जुनी कागदपत्रे समोर आल्यानंतर त्याची जन्मतारीख 15 फेब्रुवारी 1999 असल्याचे निष्पन्न झाले.
कारभारी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नाना सातव यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अमोल याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच अन्य तिघांवर फसवणूक व खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करता येऊ शकतो
(Maharashtra Young Cricketer Arrested By Baramati Police After fudging Age Case In MCA Tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट