बर्मिंघम येथे सध्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा थरार सुरू आहे. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रविवारी (३१ जुलै) बिंदियाराणी देवी हिने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. तिच्या या यशस्वी कामगिरीनंतर राष्ट्रकुळ खेळात भारताच्या पदकांची संख्या वाढून ४ वर पोहोचली आहे.
टोकियो ऑलिंपिकची रौप्य पदक विजेती मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) सुवर्ण पदक पटकावल्यानंतर २३ वर्षीय बिंदियाराणीने (Bindyarani Devi) स्नॅच वर्गात ८६ किलो वजन उचलत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. त्यानंतर क्लीन एँड जर्कमध्ये ११६ किलो वजन उचलत तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला आहे.
तिच्या या दैदिप्यमान यशप्राप्तीनंतर भारताचे राष्ट्रतपी दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक विजेत्या बिंदियाराणीला शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रकुल खेळांमध्ये वेटलिफ्टिंगमधील महिला ५५ किलो वजनी गटातून रौप्य पदक जिंकणाऱ्या बिंदियाराणीचे अभिनंदन. तू तुझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलेस आणि खेळाचा स्तर उंचावण्यासाठी जल्लोषाने प्रदर्शन केले. प्रत्येक भारतीयाला तुझ्या यशाचा आनंद आहे.”
तसेच पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “राष्ट्रकुल खेळात बर्मिंघममध्ये रौप्य पदक जिंकण्यासाठी बिंदियाराणी तुला शुभेच्छा.”
SUPER SENSATIONAL SILVER FOR BINDYARANI 🔥🔥
Bindyarani Devi 🏋♀️wins 🥈in the Women's 55kg with a total lift of 202kg, after an amazing come back 💪💪
Snatch – 86 kg (PB & Equalling NR)
Clean & Jerk – 116 kg (GR & NR)With this 🇮🇳 bags 4️⃣🏅 @birminghamcg22#Cheer4India pic.twitter.com/iFbPHpnBmK
— SAI Media (@Media_SAI) July 30, 2022
दरम्यान नायझेरियाची अदिजत अदेनाइके ओलारिनोये हिने २०३ (९३ किलो, १११ किलो) किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले आहे. तर इंग्लंडच्या फ्रेयर मॉरोने १९८ किलो (८९ किलो, १०९ किलो) वजन उचलत कांस्य पदक पटकावले आहे.
मीराबाई चानूचे सुवर्ण यश
दुसरीकडे राष्ट्रकुल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अर्थात ३० जुलै रोजी मीराबाई चानू हिने सुवर्णपदक जिंकत सर्वांची मान उंचावली. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात चानूने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलून सुवर्ण पटकावले. सोबतच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विक्रमही केला.