आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील दोन सामन्यात भारतीय संघाने मोठ्या अंतराने विजय मिळवले. परंतु अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून होते. मात्र आता अफगानिस्तान पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ देखील उपांत्य फेरीतून बाहेर झाला आहे. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाची खिल्ली उडविली आहे.
अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यावर कोट्यवधी भारतीयांच्या नजरा होत्या. कारण या सामन्यात जर न्यूझीलंड संघ पराभूत झाला असता ,तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळाली असती. परंतु अफगानिस्तान संघ पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ देखील स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अशातच वीरेंद्र सेहवागने देखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वीरेंद्र सेहवागने कु ॲपवर एक मजेशीर मिम शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी भाषण देताना दिसून येत आहे, ज्यावर ‘खत्म, टाटा, बाय बाय,” असे लिहिले आहे.
इथे पाहा सेहवागने शेअर केले मीम-
https://www.kooapp.com/koo/VirenderSehwag/8c98094d-667d-4cbb-9efc-c1b4e3e5b5b1
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी देखील बॉलिवूडचा एक मिम शेअर केला आहे. ज्यामध्ये भारत आणि अफगानिस्तान सायकलवर दिसून येत आहे आणि न्यूझीलंड त्यांच्या मागून येऊन सायकल घेऊन जात आहे.
Sigh.. #NZvAFG #T20WorldCup pic.twitter.com/Nm6LqIjZxU
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 7, 2021
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगानिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगानिस्तान संघाकडून प्रथम फलंदाजी करताना नाजिबुल्लाह जदरानने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर गुलबदिन नईबने १५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर अफगानिस्तान संघाला २० षटक अखेर ८ बाद १२४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसनने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनवेने नाबाद ३६ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
खत्म टाटा बाय बाय..! अफगाणिस्तानवर न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियावरील मीम्सचा सोशल मीडियावर पूर
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?