इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहायला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलिया पहिलावहिला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मिचेल मार्श याला दिल्ली कॅपिटल्सने मोठी बोली लावत आपल्या संघात सामील केले.
सन २०२१ मध्ये तुफान फॉर्ममध्ये राहिलेल्या मिचेल मार्श याच्यासाठी सर्व आयपीएल संघांनी मोठी बोली लावली. सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये त्याला घेण्यासाठी जबरदस्त लढत पाहायला मिळाली. अखेरीस, ६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत दिल्लीने त्याला आपल्याकडे खेचले. मार्शने संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी२० विश्वचषकात जबरदस्त खेळी दाखवला होता. त्याने अंतिम सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्स संघाला विजय मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता.
महत्वाच्या बातम्या-