ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू मिशेल स्टार्कने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने क्रिकेटचे मैदान तर गाजवले आहेच. त्याचबरोबर त्याने आपल्या कामगिरीने क्रिकेटविश्वात आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याचा लहान भाऊ देखील आता त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहे. परंतु त्याने क्रिकेटमध्ये नाही तर ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मिचेल स्टार्कचा धाकटा बंधू ब्रेंडन स्टार्कने उंच उडी मारत ऑस्ट्रेलियाच्या सर्व लोकांमध्ये आशा निर्माण केली आहे. ब्रेंडन स्टार्कने २.८ मीटर उडी घेऊन टोकियो ऑलिम्पिक अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे.
ब्रेंडन स्टार्कची कारकीर्द
२०१० च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेतून त्याने पदार्पण करत रौप्य पदक जिंकले होते. तिथे त्याने २.१९ मीटर उडी मारली होती, ती त्याची वैयक्तिक सर्वोत्तम उडी होती. २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्रेंडन आठव्या स्थानावर होता. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकसाठीही त्याची निवड झाली होती. त्याने पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला, पण शेवटी तो १५ व्या स्थानावर राहिला.
२०१७ मध्ये तो दुखापतीमुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. परंतु २०१८ मध्ये राष्ट्रकुल खेळामध्ये त्याने शानदार पुनरागमन केले आणि २.३२ मीटर उडी मारून सुवर्णपदक देखील जिंकले होते. त्याचवर्षी त्याने डायमंड लीगचा अंतिम सामना देखील जिंकली होती. २०२१ मध्ये त्याने २.३३ मीटर उडी मारली आणि चौथे राष्ट्रीय उंच उडीचे विजेतेपद पटकावले होते. याखेरीज आता त्याला ऑलिम्पिक अंतिम सामन्याचे तिकीट देखील मिळाले आहे.
Brandon Starc, brother of Australia quick Mitchell, has qualified for the men's High Jump final at #Tokyo2020
Can you see the resemblance? pic.twitter.com/WU6Apx2qmD
— Wisden (@WisdenCricket) July 30, 2021
ब्रॅंडन स्टार्कने टोकियोमध्ये उत्तम खेळ दाखवला आहे आणि आता त्याने पदकासाठी आपला दावा पक्का केला आहे. ब्रेंडन उंच उडीचा अंतिम सामना रविवारी (१ ऑगस्ट) खेळला जाणार आहे. संपूर्ण जगाची नजर त्याच्या कामगिरीवर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-