आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सला 8 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे केकेआरच्या एकाही फलंदाजाला यश आले नाही. याबरोबरच आरसीबीच्या गोलंदाजांनी एकाच डावात 4 षटके निर्धाव टाकत आयपीएलमध्ये विक्रम नोंदवला आहे. यातील दोन षटके निर्धाव टाकत वेगवान गोलंदाज सिराजनेही आयपीएलमध्ये विक्रम नोंदवला.
सिराजने केला विक्रम
या सामन्यात मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि सलग दोन षटके निर्धाव फेकत 3 गडी बाद केले. सिराजने यापूर्वी अशी कामगिरी कधीही केली नव्हती. आयपीएल सामन्यात दोन षटके निर्धाव फेकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.
चार षटके निर्धाव फेकत आरसीबीने केला अनोखा विक्रम
मोहम्मद सिराजच नाही तर आरसीबी संघानेही एक खास विक्रमही नोंदवला. आरसीबीच्या तीन गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कधीही न झालेला विक्रम नोंदवला. सिराज शिवाय वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसने १ षटक निर्धाव फेकले. त्यानंतर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनेदेखील एक षटक निर्धाव फेकले. त्यामुळे तिघांनी मिळून एकूण चार षटके निर्धाव फेकली आणि आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कधीही न झालेल्या विक्रमाची नोंद झाली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका डावात ४ षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर झाला आहे.
केकेआरचे फलंदाज ठरले अपयशी
केकेआरविरुद्ध नव्या चेंडूने भेदक मारा करणाऱ्या आरसीबीच्या गोलंदाजांनी कोणत्याही फलंदाजाला क्रीझवर टिकूच दिले नाही. 20 षटके खेळल्यानंतर केकेआरने केवळ 84 धावा केल्या. या आयपीएलमधील ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. केकेआरकडून कोणालाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने सर्वाधिक 30 धावांचे योगदान दिले.
या सामन्यात सिराजने 3 आणि फिरकीपटू चहलने 2 गडी बाद केले. तसेच नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरच्या फलंदाजांची शरणागती; गुणतालिकेत थेट दुसऱ्यास्थानी
‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया
अखेर ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘हा’ भारतीय दिग्गज करणार पुनरागमन
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
–आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज