भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका रोमांचक होईल, अशी अपेक्षा अनेकांनी केली आहे. कारण दोन्ही संघांनी नजीकच्या काळात मोठे विजय मिळवले असून दोन्ही संघातील खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंडने श्रीलंकेला श्रीलंकेत तर भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे दोन्ही संघांमध्ये पुरेपुर आत्मविश्वास आहे.
तसेच दोन्ही संघ तगड्या संघांमध्येही गणले जातात. त्यामुळे सध्या या दोन संघात होणाऱ्या मालिकेबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. ही मालिका सुरु होण्याआधी या लेखात आपण एका खास विक्रमाबद्दल जाणून घेऊ, ज्यात भारतीय संघाने वर्चस्व मिळवले आहे.
गेल्या ६ वर्षातील म्हणजेच १ जानेवारी २०१५ पासूनची आकडेवारी लक्षात घेतली, तर सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंड संघाने खेळले आहेत. त्यांनी ७८ सामने खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने ६२ आणि भारताने ६० सामने खेळले आहेत. तसेच सर्वाधिक विजय इंग्लंड आणि भारताने मिळवले आहेत. दोन्ही संघांनी २०१५ पासून प्रत्येकी ३७ विजय मिळवले आहेत.
असे असले तरी सर्वाधिक वेळा एका डावाने सामना जिंकण्याचा विक्रम मात्र, भारतीय संघाच्या नावावर आहे. गेल्या ६ वर्षात भारताने तब्बल १२ वेळा एका डावाने कसोटी सामना जिंकला आहे. भारताशिवाय केवळ न्यूझीलंडला १० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा एका डावाने कसोटी विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडने १० वेळा एका डावाने कसोटी सामने गेल्या ६ वर्षात जिंकले आहे.
सन २०१५ पासून सर्वाधिकवेळा एका डावाने कसोटी सामना जिंकण्याच्या यादीत भारत आणि न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आहेत. ऑस्ट्रेलियाने ९ वेळा तर इंग्लंडने ६ कसोटी सामन्यांत एका डावाने विजय मिळवला आहे.
१ जानेवारी २०१५ पासून एका डावाने सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे संघ –
१२ – भारत
१० – न्यूझीलंड
९ – ऑस्ट्रेलिया
६ – इंग्लंड
५ – दक्षिण आफ्रिका
२ – बांगलादेश
१ – वेस्ट इंडिज
१ – श्रीलंका
महत्त्वाच्या बातम्या –
टी१० लीगमध्ये तिसरा दिवशी ठरला रोमांचक, ‘या’ संघांनी साजरे केले विजय
कोहलीच्या विचाराने इंग्लंडच्या खेळाडूला फुटला घाम; म्हणाला, “आम्ही त्याला आऊट करायचं तरी कसं?”
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत कोणत्या संघाचे पारडे जड? इयान चॅपेल यांनी वर्तवला अंदाज