आज(२५ सप्टेंबर) आयपीएल २०२० च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १७५ धावा केल्या आहेत. तसेच चेन्नईला १७६ धावांचे आव्हान दिले. यावेळी चेन्नईकडून फिरकीपटू पियुष चावलाने २ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ(६४) आणि शिखर धवन(३५) या खेळपट्टीवर स्थिर झालेल्या सलामीवीरांच्या जोडाला बाद केले आणि चेन्नईला सामन्यात पुनरागम करुन दिले. याबरोबरच त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध २२ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत लसिथ मलिंगासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर फिरकीपटू हरभजन सिंग आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएलमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत.
चावलाने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत एकूण १६० सामन्यात १५४ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे लसिथ मलिंगा(१७०) आणि अमित मिश्रा(१५७) आहेत.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
२४ विकेट्स – हरभजन सिंग
२२ विकेट्स – पियुष चावला
२२ विकेट्स – लसिथ मलिंगा
२० विकेट्स – आर अश्विन