नवी दिल्ली। मागील वर्षी २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेटपासून दूर आहे. परंतु आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. पुढील महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२०मध्ये धोनी मैदानावर दिसणार आहे. धोनी याआधी २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२०च्या तयारीमध्ये लागला होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्थगित करण्यात आले आणि त्यामुळे धोनीला चेन्नईतून पुन्हा घरी जावे लागले होते. परंतु आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन होणार आहे आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला १५ ऑगस्टपूर्वी यूएईमध्ये आपले शिबिर आयोजित करायचे आहे. यूएईला रवाना होण्यापूर्वी सीएसके कर्णधार एमएस धोनीने आपल्या नव्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. नव्या लुकमध्ये धोनीने हेअर कट आणि शेविंग केली आहे. लॉकडाऊनमध्ये धोनी दाढी वाढवलेल्या आपल्या नव्या लूकमध्ये पहायला मिळाला होता.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला अधिक वेळेची आवश्यकता
खरंतर चेन्नई सुपर किंग्ज संघात अधिकतर खेळाडू ३० पेक्षा अधिक वयाचे आहेत आणि त्यांना निश्चितच इतर संघांच्या तुलनेत फीटनेससाठी अधिक वेळेची आवश्यकता आहे. सीएसकेचे ३ खेळाडू एमएस धोनी, सुरेश रैना आणि हरभजन सिंग जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर आहेत. त्यामुळे इतर संघाआधी सीएसकेला सराव सुरू करायचा आहे.
https://www.instagram.com/p/CDYP4qrhDxZ/?utm_source=ig_web_copy_link
मोकळ्या स्टेडिअममध्ये नाही होणार आयपीएल
माध्यमांतील काही वृत्तांनुसार आयपीएलचे आयोजन मोकळ्या स्टेडिअममध्ये होणार नाही. अमिराती क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, ते आयपीएलदरम्यान स्टेडिअममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊ शकतात. अमिराती क्रिकेट बोर्डाचे सचिव मुबाशिर उस्मानी यांनी शुक्रवारी म्हटले की, जर सरकारने परवानगी दिली, तर ते यूएईत होणाऱ्या आयपीएलमध्ये स्टेडिअममध्ये ३० ते ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती देऊ शकतात.
आयपीएलचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये होणार आहे, ज्यामध्ये २५००० प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
-कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या अमित शहांकडे आयपीएल न होण्यासाठी साकडे, पहा कुणी केलीय मागणी
-२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
ट्रेंडिंग लेख-
-सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
-कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन
-लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज