आयपीएल स्पर्धेला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होत आहे.आयपीएल क्रिकेट लीग स्पर्धा ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट लीग स्पर्धा आहे. या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने असणार आहेत. अशातच या मोठ्या सामन्यापूर्वी कर्णधार एमएस धोनीचा ७ वर्षांपूर्वीचा एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. यंदा धोनीचा संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशातच एमएस धोनीने ७ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये एक ट्विट केले होते जे आता प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने लिहिले होते की ,” मला फरक नाही पडत कुठला संघ जिंकेल, मी इथे मनोरंजनासाठी आहे.”
Doesn't matter which team wins,I am here for entertainment
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) March 23, 2014
या ट्विटवर अनेक चाहत्यांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी धोनीच्या या वक्तव्याचा समाचारही घेतला आहे.
एका चाहत्याने लिहिले आहे की,” विद्या बालन ट्विटरवर नाहीये ” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की,” सर तुम्ही मनोरंजनाचे बाप आहात, हॅट्स ऑफ.”
CSK whether lose or Win!! Known for 3 things "entertainment, entertainment & entertainment"😂😎🦁
— chinmaya mahapatra (@Chinmaya1Chinu) April 3, 2021
Sir aap entertainment k baap ho hats off to u..
.— Ramanuj (@ramanujkr_26) April 21, 2019
Yeahh these type of entertainment. Still memes on you are best!!!! pic.twitter.com/Y9j8Uz50Uw
— Touseef Akhtar (@AkhtarNotShoaib) April 2, 2020
https://twitter.com/kasatarihotay/status/1377283217556865024?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1377283217556865024%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.news18.com%2Fnews%2Fbuzz%2Fdhoni-fans-dig-out-csk-skippers-7-year-old-tweet-hilariously-predict-the-loser-of-ipl-2021-3596363.html
https://twitter.com/aishaaax6/status/1377179416128671747?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1377179416128671747%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.news18.com%2Fnews%2Fbuzz%2Fdhoni-fans-dig-out-csk-skippers-7-year-old-tweet-hilariously-predict-the-loser-of-ipl-2021-3596363.html
https://twitter.com/Freak4Sidharth/status/1376496107241369604?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1376496107241369604%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.news18.com%2Fnews%2Fbuzz%2Fdhoni-fans-dig-out-csk-skippers-7-year-old-tweet-hilariously-predict-the-loser-of-ipl-2021-3596363.html
Doesn't matter which team wins,I am here for entertainment
: Rishabh Pant https://t.co/9qey4GoMsE
— Kush (@Mehta_Kush_) March 28, 2021
आयपीएल २०२० मध्ये सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतली होती. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसून आला होता. या संघाने अतिशय सुमार कामगिरी केल्यामुळे संघ सातव्या स्थानावर राहिला होता. परंतु यावर्षी सुरेश रैनाने चेन्नई संघात पुनरागमन केले आहे तर संघाने इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धेत चेन्नईला या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्ज संघ
एमएस धोनी ( कर्णधार) , फाफ डु प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडि, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भागात वर्मा, हरी निशांत.