‘अ’ गटातील आजच्या शेवटच्या दिवशी टॉप 2 संघाच्या मध्ये दुसरी लढत झाली. अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स सामना अत्यंत चुरशीचा होणार होता यात काही शंका नव्हती. मुंबई उपनगर संघाच्या विरुद्ध अहमदनगरचा टॉप रेडर शिवम पटारे संघर्ष करताना दिसत होता तर प्रफुल झावरे चढाई मध्ये गुण मिळवत होता.
दोन्ही संघाची बचावफळी जोरदार खेळ करत होती. अहमदनगर संघाने 12 व्या मिनिटाला मुंबई उपनगर संघावर लोन पडत आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र भारत खारगुटकर चे चपळ चढाया करत तर अलंकार पाटीलने पकडी करत मुंबई उपनगर संघाला पुन्हा सामन्यात आणले. अहमदनगर संघावर लोन पडत मध्यंतरा पर्यत 22-18 अशी आघाडी मिळवली.
मध्यंतरानंतर सुरू झालेल्या खेळात दोन्ही संघ एकमेकांचा चांगला प्रतिकार करत होते. कोणत्याही संघाला मोठी आघाडी मिळवता येत नव्हती. शेवटची 9 मिनिटं शिल्लक असताना मुंबई उपनगरच्या शुभम दीडवाघ ने 5 गुणांची सुपर रेड करत अहमदनगर संघाला ऑल आऊट केला.
अतिशय रोमहर्षक झालेल्या हा लढतीत दोन्ही संघानी एकमेकांना दोन वेळा ऑल आऊट केला. शेवटच्या मिनिटाला 37-37 असा बरोबरीत सामना ठेवण्यात दोन्ही संघानी पसंद केले. अहमदनगर कडून प्रफुल झावरे ने चढाईत सर्वाधिक 17 गुण तर मुंबई उपनगर संघाकडून शुभम दिडवाघ ने 8 व भारत खारगुटकर ने 9 गुण मिळवले. अहमदनगरच्या अजित पवार ने 5 पकडी तर संभाजी वाबळे ने 4 पकडी केल्या. मुंबई उपनगर संघाकडून अलंकार पाटील व विघ्नेश पवार ने प्रत्येकी 4-4 पकडी केल्या.
बेस्ट रेडर- प्रफुल झावरे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- अजित पवार, अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- शुभम दीडवाघ, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
(Mumbai upanagar Murthal Magnets vs Ahmednagar Periyar Panthers draw)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना शिस्तीत आणण्यासाठी गावसकरांनी सुचविला ‘हा’ उपाय, म्हणाले, “वाईड चेंडू टाकणारे…”
‘दोन वर्षात तो टीम इंडियात दिसेल’, आयपीएल गाजवत असलेल्या युवा खेळाडूबाबत खुद्द हार्दिकचे भाकीत