सेनादल क्रीडा मंडळाने ४०व्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत विजेतेपद मिळविले असले, तरी नौदलाच्या सतनाम सिंगने त्यांना निर्विवाद वर्चस्वापासून दूर ठेवले. सीएमईच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेत सेनादलाने आठपैकी सात शर्यती जिंकल्या. यामध्ये पॅरा सिंगल स्कल्सचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्पर्धेत युवा ऑलिम्पियन सतनाम सिंगने २००० मीटर शर्यतीत मिळविलेले विजेतेपद विशेष ठरले, तर महाराष्ट्राला मृण्मयीच्या सुवर्णपदकाचा दिलासा मिळाला.
सेनादल आणि लष्करया दोन क्रीडा संस्थांमध्ये झालेल्या अंतिम लढतीत सेनादलाने बाजी मारली. कॉक्स एट्स, क्वाड्रपल स्कल्स, कॉक्सलेस फोर, डबल स्कल्स, लाईटवेट डबल स्कल्स या प्रकारात लष्कराच्या या दोन संघांतच खरी चुरस झाली. युवा ऑलिम्पियन सतनाम सिंगने ७ मिनिट ११.९ सेकंद वेळ देताना २००० मीटर शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. पुरुष एकेरी स्कल्स प्रकारातील हा सर्वांत सनसनाटी निकाल ठरला. सतनामने दीड महिन्यापूर्वी पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. त्याला ऑलिम्पियन अरविंद सिंग, करमजीत यांचे आव्हान होते. सतनामच्या यशामुळे स्पर्धेत या एकाच शर्यतीत सेनादलाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महिला विभागात महाराष्ट्राला मृण्मयी साळगांवकरने मिळविलेल्या सुवर्णपदकाचा दिलासा मिळाला. महाराष्ट्रासाठी स्पर्धेतील हे एकमेव यश होते. मृण्मयीने ८ मिनिट २४.४ सेकंद अशी वेळ दिली. मुळ नाशिकच्या असलेल्या मृण्मयीने गतविजेत्या कुशप्रीत कौरला पाच सेकंदानी मागे टाकले. उत्तर प्रदेशाची किरण देवी तिसरी आली. या कामगिरीने मृण्मयीने गेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील आपल्या ब्रॉंझपदकाचा रंग बदलला. पुण्यात झालेल्या अखेरच्या राष्ट्रीय स्पर्धेत ती ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली होती.
महिला विभागात ओडिशाने वर्चस्व राखले. त्यांनी तीन, मणिपूरने दोन, तर महाराष्ट्र, केरळने प्रत्येकी एक शर्यत जिंकली. ओडिशाच्या मुलींनी कॉक्स एट्स, कॉक्सलेस पेअर्स, लाईट वेट डबल स्कल्स या शर्यती जिंकल्या. मणिपूरने क्वाड्रपल स्कल्स, डबल स्कल्स, तर केरळने कॉक्सलेस फोर शर्यत जिंकली. स्पर्धेत आता उद्या शनिवारपासून खुल्या स्प्रिंट स्पर्धा प्रकाराला सुरुवात होईल. (National Sailing news)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’