जवळ जवळ १८ वर्षांनंतर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये उत्सवाचे वातावरण होते कारण ते जगातील पहिल्या क्रमांकाच्या एकदिवसीय संघाचा सामना करणार होते. पण अचानक परिस्थिती बदलली. न्यूझीलंडने रावळपिंडीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये येण्यास नकार दिला आणि काही काळानंतर संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला.
न्यूझीलंडने मालिका रद्द करण्याबाबत पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे कारण दिले आहे. न्यूझीलंडने अचानक अशी मालिका रद्द केल्यानंतर पाकिस्तानी मीडिया आणि चाहत्यांनी न्यूझीलंड संघावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराने न्यूझीलंडला क्राइस्टचर्च गोळीबाराची आठवण करून दिली आहे.
पाकिस्तानी क्रीडा पत्रकार रोहा नदीमने ट्विट करून लिहिले आहे की, ‘न्यूझीलंड विसरला आहे की, बांगलादेशचे खेळाडू क्राइस्टचर्च मशिदीतील गोळीबारापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते. तेव्हा तुमची गुप्तचर संस्था कुठे होती? जगाने ती गोष्ट विसरली आहे. जणू काही घडलेच नाही. पण आजही इतर संघ पाकिस्तानला भेट देताना संकोच करत असतात. सन २०१९ न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये असलेल्या एका मशिदीत गोळीबार झाला होता, ज्यात ४ लोकांनी आपला जीव गमावला होता. बांगलादेश संघ त्यावेळी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता आणि संपूर्ण संघ त्याच मशिदीत नमाज अदा करणार होता. पण ते तिथे पोहचण्यापूर्वीच गोळीबार झाला होता.’
Have NZ forgotten how Bangladesh players were minutes away from Christchurch mosque at the time of shootings? Where was their intelligence then?
The world moved on like nothing happened but somehow touring Pak is a trip to Mordor. #PakvNZ
— Roha Nadeem (@RohaNadym) September 17, 2021
— Roha Nadeem (@RohaNadym) September 17, 2021
न्यूझीलंडवर टीका करतांना एका पाकिस्तानी चाहत्याने सांगितले की, कोविड महामारीदरम्यान पाकिस्तानने धोका पत्करून न्यूझीलंडला भेट दिली. कदाचित न्यूझीलंड हे विसरले असेल. न्यूझीलंडने ज्याप्रकारे पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे आणि त्यामुळे पीसीबी आणि पाकिस्तानी संघाची बदनामी होत आहे.
The security situation in Pakistan is great and satisfactory. Extraordinary security has been provided to the New Zealand team. After complete assurance and satisfaction, Call for this last minute withdrawal and postponement of the series by NZ is beyond understanding.
#PAKvNZ— Faisal Javed Khan (@FaisalJavedKhan) September 17, 2021
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी बोलले, परंतु असे असूनही हा दौरा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने ही खूप अपमानास्पद बाब मानली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दौरा रद्द केल्याने संतापले रमीज राजा, न्यूझीलंड बोर्डाला दिली धमकी
विराटने टी२०चे नेतृत्त्वपद सोडणे टीम इंडियाच्या येणार अंगाशी, ‘या’ गोष्टींमध्ये होऊन बसणार अवघड