जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा २३ जून रोजी समाप्त झाली. न्यूझीलंड संघ भारताला नमवत या स्पर्धेचा पहिला विजेता बनला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सुमार कामगिरी केलेल्या फलंदाजांवर अनेक जण टीका करत आहेत. आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास भारतीय संघातील फलंदाजांनी तीन वर्षांपूर्वीची आपली एक नकोशी कामगिरी पुन्हा एकदा केली आहे.
लॉर्ड्सनंतर एजबॅस्टन
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दोन्ही डावात फलंदाजी केली. पहिल्या डावात भारतीय संघ २१७ तर, दुसऱ्या डावात १७० धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे दोन्ही डावात एकाही भारतीयाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारतीय संघासाठी पहिल्या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या डावात यष्टीरक्षक रिषभ पंतने ४१ धावा बनविल्या.
भारतीय संघातील फलंदाज ऑगस्ट २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे खेळताना एकही अर्धशतक झळकावू शकले नव्हते. भारतीय संघाला या सामन्यात एक डाव व १५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने पहिल्या डावात २९ तर, दुसऱ्या डावात नाबाद ३३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता जवळपास तीन वर्षांनंतर भारतीय संघातील एकही फलंदाज कसोटी सामन्यात अर्धशतक साजरे करू शकला नाही.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून गणल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली. अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा दोन्ही डावात (३४ व ३०) चांगली सुरुवात मिळून देखील मोठ्या धावा बनवण्यात ठरला. कर्णधार विराट कोहली (४४ व १५) दोन्ही डावात आदल्या दिवशी नाबाद राहिल्यानंतर पुन्हा मैदानावर उतरताच झटपट माघारी परतला. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे देखील आपल्या लौकीकास साजेसा खेळ करू शकले नाहीत. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनादेखील धावांचा वेग वाढवणे जमले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमध्ये न्यूझीलंडचा गाजावाजा! कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा
WTC फायनलमध्ये भारतीय संघाला नडल्या ‘या’ ५ चूका; वाचा काय आहेत पराभवाची कारणे