चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगला आहे. शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खूपच खराब झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 263 धावांवर संपुष्टात आला. अशातच सामन्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एका दमदार खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे या धुरंधरावर सामन्यातून बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.
चालू सामन्यातून बाहेर होणार ‘हा’ दमदार खेळाडू
ऑस्ट्रेलिया संघाच्या डावादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने टाकलेला एक चेंडू डेविड वॉर्नर (David Warner) याच्या कोपराला लागला होता. वॉर्नरला दुखापतीमुळे फिजिओंना मैदानावर बोलवावे लागले होते. तो विव्हळतानाही दिसला होता. वॉर्नरला झालेली ही दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
Edged & taken! ☝️
Breakthrough for #TeamIndia, courtesy @MdShami11 👏
Watch 🔽 #INDvAUS pic.twitter.com/Qihb7Rfsrx
— BCCI (@BCCI) February 17, 2023
हेल्मेटवर जाऊन लागला उसळी चेंडू
या डावादरम्यान सिराजचा एक चेंडू वॉर्नरच्या हेल्मेटवरही जाऊन लागला. वॉर्नरला या घातक गोलंदाजीपुढे एक-एक धाव करताना नाकी नऊ येत होत्या. त्याने यावेळी फक्त 15 धावांचे योगदान दिले आणि तंबूत परतला. त्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवेळी वॉर्नर मैदानावर क्षेत्ररक्षण करण्यासाठीही आला नव्हता. अशात त्याच्या दुखापतीवर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने मोठी अपडेट दिली आहे. त्याने यावेळी ताफ्यात बदल होऊ शकतो, असेही सांगितले.
Mohammed Shami with the first breakthrough for India as David Warner departs for 15 💥#INDvAUS | #WTC23 pic.twitter.com/r6Rkqdt2IT
— ICC (@ICC) February 17, 2023
काय म्हणाला ख्वाजा?
उस्मान ख्वाजाने माध्यमांशी बोलताना वॉर्नरच्या दुखापतीबद्दल भाष्य केले. तो म्हणाला की, “वैद्यकीय पथक उद्या त्याच्या दुखापतीबाबत आकलन करेल, तो यावेळी जरा दमलेला आहे. त्याला हात आणि डोक्यावर दुखापत झाली आहे. मला वाटते की, डोक्याच्या दुखापतीचा त्याला त्रास होत आहे त्यामुळे तो मैदानावर येऊ शकला नाही. यापुढे काय होते, हे वैद्यकीय पथकाला शोधावे लागेल.”
ऑस्ट्रेलियन माध्यमांनुसार, जर वॉर्नर सामन्यातून बाहेर झाला, तर त्याच्या जागी मॅट रेनशॉ (Matt Renshaw) सलामीला फलंदाजी करेल. रेनशॉ याने नागपूर येथे पहिल्या कसोटीत फलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 0 धावा केल्या होत्या. (opener david warner might get replaced by matthew renshaw he unwell after helmet blow ind vs aus)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच रॉयल्सला धक्का, प्रमुख गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर
दिल्लीत चार विकेट्स घेण्यासाठी शमीला कसा मिळाला खेळपट्टीचा फायदा? वाचा सविस्तर