भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (18 ऑक्टोबर) पार पडली. यात बीसीसीआयचे नवे प्रशासकीय मंडळ तसेच इतर अनेक मोठे निर्णय घेतले गेले. त्यापैकी एक निर्णय म्हणजे पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ जाणार नसल्याचा होता. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट शब्दात भारतीय संघ पाकिस्तानला जाणे, हे संपूर्णपणे सरकारवर अवलंबून असल्याचे म्हटले. भारताच्या या भूमिकेनंतर आता पाकिस्तान पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकातून माघार घेणार, या चर्चेला उधाण आले आहे.
आशिया चषकासाठी पाकिस्तान दौरा करण्याबाबत जय शहा म्हणाले की, “आम्हाला आशिया चषक 2023 न्युट्रल व्हेन्यूवर हवा आहे. संघाच्या पाकिस्तान दौऱ्याविषयी सरकार निर्णय घेत असते, त्यामुळे आम्ही त्याविषयी बोलणार नाही. पण आशिया चषक 2023 साठी आमचा निर्णय झाला आहे. ही स्पर्धा न्युट्रल व्हेन्यूवर आयोजित केली जाईल.”
When all international teams and international cricketers come to Pakistan for @OfficialPSL, what is @BCCI's problem. If BCCI is willing to go to a neutral venue, then @TheRealPCB should also be willing to go to a neutral venue for the WC in India next year.#PAKvIND #Cricket
— Saeed Anwar (@ImSaeedAnwar) October 18, 2022
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारताने आशिया चषकात सहभाग घेतला नाही तर, पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर याने ट्विट करत लिहिले,
“मोठेमोठे खेळाडू आणि संघ पाकिस्तानमध्ये पीएसएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी येतात. तर, बीसीसीआय व भारतीय संघाला काय समस्या आहेत. भारताला आशिया चषकासाठी न्यूट्रल व्हेन्यू हवा असेल तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी अशाच न्यूट्रल व्हेन्यूची मागणी करायला हवी.”
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध बिघडले असल्याने दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मग पुढच्या वर्षी होणार विश्वचषकही…’, पाकिस्तानी क्रिकेटपटूचे बीसीसीआयला प्रत्युत्तर
प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो