वनडे विश्वचषक 2023 हंगाम भारतात आयोजित केला गेला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुप्रतिक्षीत शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने जिंकला. पाकिस्तानला आपला पुढचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. मात्र, या सामन्याआधी पाकिस्तानचे खेळाडू आजारी पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) विश्वचषक हंगामातील आपला चौथा सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. बेंगलोरमध्ये शुक्रवारी (20 ऑक्टोबर) हा सामना आयोजित केला गेला आहे. पण या सामन्याआधी पाकिस्तान संघासाठी गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होताना दिसत नाहीत. वृत्तांनुसार चौथ्या विश्वचषक सामन्यासाठी पाकिस्तानचे काही महत्वाचे खेळाडू अनुउपलब्ध अशू शकतात. खेळाडूंना व्हायरल ताप आल्याचे सांगितले जात आहे. याच कारणास्तव मंगळवारी (17 ऑक्टोबर) पाकिस्तानचे सराव सत्र देखील रद्द केले गेले. माहितीनुसार भारताविरुद्ध शनिवारी पराभव स्वीकारल्यानंतर खेळाडूंच्या तब्येतीविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. असेही सांगितले गेले आहे की, पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफीक याची तब्येत अधिकच खालावली आहे आणि आगामी सामन्यातून तो माघार देखील घेऊ शकतो.
पाकिस्तान संघात आलेली तापाची साथ पाहता वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अनेकांनी खेळाडूंना डेंगू झाल्याची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, विश्वचषक 2023 सुरू होण्याआधी भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यू झाला होता. आजारपणामुळे गिल विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. तसेच अनुभवी समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनाही डेंग्यू झाल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले आहे. अशात पाकिस्तान संघासाठीही डेग्यू ही नवी डोकेदुखी ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या –
SAvsNED । वयाच्या 28व्या वर्षी रबाडाने पार केला मैलाचा दगड! वनडेतील आकडेवारी भूरळ घालणारी
भारताविरुद्धच्या सामन्याआधीच बांगलादेश मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू होणार सामन्यातून बाहेर?