आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सुपर फोरचा सामना रोमांचक झाला. रविवारी (4 सप्टेंबर) हा सामना दुबई येथे खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्सने विजय मिळवला. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या मार्गावर होते. मात्र, अखेरीस पाकिस्तानने संयम दाखवत विजय आपल्या नावे केला. मात्र या अखेरच्या काही मिनिटात पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होऊ लागला आहे.
पाकिस्तानने सुपर फोरच्या या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघावर 5 गडी राखून विजय मिळवला. अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पाकिस्तानला हा विजय मिळाला. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 7 धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतरही सामना 2 चेंडू 2 धावा या समीकरणापाशी येऊन पोहोचला होता. मात्र, अखेरीस पाकिस्तानने एक चेंडू राखून विजय आपल्या नावे केला.
Yooo 🔥🔥🔥🇵🇰🇵🇰🇵🇰 pic.twitter.com/Aq2J5HdesQ
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 4, 2022
या संपूर्ण स्थितीत पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये कमालीचे तणावाचे वातावरण झाले होते. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा तर पूर्ण वेळ उभा राहून सामना पाहताना दिसला. तर, मोहम्मद रिझवानही आपल्या साथीदारांना सामन्याची स्थिती समजावून सांगत होता. संघाचा अनुभवी खेळाडू शादाब खान, हारिस रऊफ आणि मोहम्मद हसनेन हे प्रत्येक चेंडू नंतर उत्साही किंवा नाराज होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. परंतु, विजयी फटका खेळल्यानंतर हे सर्व खेळाडू मिठी मारत जल्लोष करताना दिसले. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेस्ट यांना देखील या व्हिडिओमध्ये पाहता येऊ शकते.
पाकिस्तानने हा विजय मिळवत अंतिम फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले असून, आता आणखी एक पराभव भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!