क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीच्यास चौथ्या दिवशी दोन सामने चुरशीचे झाले तर दोन सामने एकतर्फी झाले. पालघर काझीरंगा रहिनोस, रायगड मराठा मार्वेल्स, सांगली सिंध सोनिक्स व रत्नागिरी अरावली ॲरोज यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघाला हरवत विजय मिळवला.
पालघर काझीरंगा रहिनोस विरुद्ध धुळे चोला वीरांस यान यांच्यात झालेला सामना पालघर संघाने जिंकला. पालघर काझीरंगा रहिनोस संघाने दोन वेळा धुळे संघाला ऑल आऊट करत सामना 41-22 असा जिंकला. पालघर कडून राहुल सवर ने सर्वाधिक 21 गुण मिळवले. तर पकडीत योगेश मोरसे ने 5 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर धुळे कडून मितेश कदम ने 9 गुण मिळवले.
रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध परभणी पांचाला प्राईड याच्यात चुरशीची लढत झाली. मध्यांतराला परभणी संघाकडे 22-20 अशी आघाडी होती. तर शेवटच्या दहा मिनिटं शिल्लक असताना
32-32 असा सामना बरोबरीत सुरू होता. शेवटचे काही मिनिटं शिल्लक असताना रत्नागिरी ने परभणी वर लोन पडत आघाडी मिळवली व ती कायम ठेवत सामना 50-47 असा जिंकला. रत्नागिरी कडून चढाईत साहिल शिंदे ने 19 गुण व श्रेयस शिंदे ने 11 गुण मिळवले.
सांगली सिंध सोनिक्स विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स यांच्यात रेलीगेशन ची लढत बघायला मिळाली. मध्यंतराला सांगली 17-14 अशी आघाडी होती. त्यानंतर मात्र सांगली संघाने आक्रमक खेळ करत सामना एकतर्फी एकतर्फी केला. तुषार खडाखे ने महत्वपूर्ण भूमिका निभावली. सांगली संघाने 42-25 असा विजय मिळवला. रायगड मराठा मार्वेल्स विरूद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स यांच्यात अत्यंत चुरशीची झालेली ही लढत रायगड संघाने 29-27 अशी जिंकली. रायगड संघाकडून रुतिक पाटील ने सर्वाधिक 11 गुण मिळवले. तर राज जंगम ने अष्टपैलू खेळ केला. तर अजय मोरे ने 3 पकडी केल्या. परभणी कडून तेजस काळभोर ने 8 गुण तर तेजस राऊत ने 7 पकडी केल्या. (Palghar Kaziranga Rhinos, Raigad Maratha Marvels third win in relegation round)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मला सॉरी बोलायची गरज नाही’, कुलदीपला असे का म्हणाला हेड कोच पाँटिंग? जाणून घ्याच
नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या पारड्यात, धोनीचा सीएसके संघ करणार प्रथम फलंदाजी