संपूर्ण देश सध्या कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे हैराण आहे. दररोज लाखो कोरोना प्रकरणे समोर येतायेत तर, हजारो लोक मरत आहेत. कोरोना काळात लोकांना वैद्यकीय सुविधांचा सर्वाधिक तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयात बेड नसल्यामुळे, ऑक्सिजनचा अभाव आणि आवश्यक औषधे नसल्यामुळे लोक आपला जीव गमावत आहेत. या संकटाच्या वेळी, प्रत्येकजण गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे करत आहे. क्रिकेट जगातील सर्व खेळाडू आपापल्या परीने लोकांना मदत करत आहेत.
कर्णधार विराट कोहली, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग, हनुमा विहारी यांच्यासह सर्व क्रिकेटपटू लोकांना मदत करतायेत. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही लोकांच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली आहे.
पंड्या बंधूंनी कोरोना पीडितांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे. कृणाल पंड्या याने एका ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. त्याने ट्वीट करून लिहिले की, ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची नवीन खेप कोविड सेंटरला जाण्यास तयार आहे. सर्वजण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.’
त्याचवेळी हार्दिक पंड्याने ट्विट केले की, ‘आपण एक कठीण लढाई लढत आहोत, यावेळी आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्याविरूद्ध संघर्ष केला पाहिजे.’
We’re in the middle of a tough battle that we can win by working together 🙏 https://t.co/VHgeX2NKIT
— hardik pandya (@hardikpandya7) May 24, 2021
दोन्ही भावांनी या महिन्याच्या सुरूवातीस लोकांना मदत करण्यास सुरवात केली होती. त्यांनी २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अनेक कोविड सेंटरला देण्याचे आश्वासन दिले होते.
हे क्रिकेटपटू करतायेत मदत
भारतातील या भीषण परिस्थितीत अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत मिळून एका सामाजिक संस्थेसाठी ११ कोटी रुपये जमा केले. वीरेंद्र सेहवाग याने दिल्लीत ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू केली आहे. पठाण बंधू बडोदामध्ये रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. तर, हनुमा विहारी याने इंग्लंडमधून या रुग्णांना मदत करण्यासाठी संघटना सुरू केली आहे. या व्यतिरिक्त अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आर्थिक स्वरुपात मदत केली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘थाला’ धोनी झाला म्हातारा? नवीन लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
निवड समीतीला पाँटिंगला करायचे होते संघाबाहेर; पण मायकल क्लार्कने केला बचाव, स्वत:च केला खुलासा