इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग समजली जाते. या लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडू जीवाचे रान करतात. अनेक खेळाडूंचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न असते. आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंना मोठ्या बोली लागतात. असे असले तरीही ते खेळाडू चांगली कामगिरी करतील असे नाही. यावरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाने टिपण्णी केली आहे.
यावर बोलताना ऑस्ट्रिलेयाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने लिलावात मिळालेले पैसे व चांगली कामगिरी याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. उलट जास्त रक्कम मिळाल्यामुळे खेळाडूवर दबाव येत असल्याचे त्याने म्हटले आहे.
“जर तुम्ही एक व्यावसायिक क्रिकेटर असाल तर मोठी बोली लागल्यावर तुमच्यावर चांगलाच दबाव येतो. जर तुम्ही एकदा चांगली कामगिरी केली तर दुसऱ्यांदा तशी कामगिरी करण्याचा दबाव तुमच्यावर असतो. तसेच जर तुम्ही खराब प्रदर्शन केले तर चांगली कामगिरी करण्याचा तुमच्यावर दबाव असतो,” असे कमिन्स म्हणाला. तो कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बोलत होता.
कोलकाता नाईट रायडर्सने २०१९ मध्ये कमिन्सला तब्बल १५ कोटी ५० लाख रुपये मोजत ताफ्यात सामील केले होते. यामुळे कमिन्स लीगमधील एक महागड्या खेळाडूंपैकी एक बनला आहे. “लिलावत मिळालेल्या रकमेमुळे एक वेगळ्या प्रकारचा दबाव येतो. आम्ही यात काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जास्त पैसे मिळाले म्हणजे तुमचा चेंडू जास्त स्विंग होईल असे होतं नाही. तसेच पैसे जास्त मिळाले म्हणून खेळपट्टीवर अचानक गवत जास्त वाढत नाही किंवा सीमारेषा मोठ्या होत नाहीत”, असेही तो पुढे म्हणाला.
गेल्या हंगामात कमिन्सने १४ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ७.८६ होता. कोलकाता नाईट रायडर्स संघ गेल्या हंगामात क्व़लिफाय देखील झाला नव्हता. तत्पुर्वी या हंगामासाठी झालेल्या लिलावात ख्रिस मॉरीस सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या अष्टपैलू खेळाडूला राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाख रुपये मोजले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
राजकारणापासून समाजसेवेपर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी
शानदार विजयानंतर विराटसेनेच्या आनंदावर विरजण, या कारणामुळे आयसीसीने ठोठावला दंड