पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीज राजा हे नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत. अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंच्या वेतनात १००,००० रुपयांची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पीसीबीने सांगितले आहे की, त्यांच्या या निर्णयामुळे १९२ देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या वेतनामध्ये तत्काळ वाढ केली जाईल.
वेतनात वाढ झाल्यामुळे प्रथम श्रेणी आणि ग्रेड स्पर्धांमधील खेळाडू प्रत्येक महिन्याला १४०,००० ते २५०,००० रुपये कमवू शकणार आहेत. पीसीबीने याबाबत सांगितले की, नवीन अध्यक्षांच्या सर्व वर्गांमधील वेतन वृद्धि करण्याच्या आदेशामुळे ग्रुप डी वर्गांतील खेळाडूंच्या वेतनात २५० पट वाढ होणार आहे.
भारतासोबत मालिकेच्या आयोजनावर रमीज राजा यांनी स्पष्ट केले मत स्पष्ट
रमीज राजा यांनी सध्या भारतासोबत चांगले संबंध बनवणे कठीण असल्याचे सांगितले. त्यानी सांगितले, आता भारतासोबत संबंध बनवणे असंभव आहे आणि ते घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. ते म्हणाले, “आता हे असंभव आहे, कारण राजकारणामुळे खेळावर वाईट परिणाम पडला आहे. आम्ही याबाबत घाई नाही कारणार. आम्हाला आमच्या देशांतर्गत आणि स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे.”
टी २० विश्वचषातील भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल दिली प्रतिक्रिया
टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला पहिला सामना होणार आहे. याबाबत रमीज यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “जेव्हा मी पाकिस्तान संघाच्या खेळाडूंशी भेटलो, तेव्हा मी त्यांना सांगितले की, यावेळी समीकरण बदलले पाहिजे. सामन्यासाठी संघाला पूर्ण तयार राहायला पाहिजे आणि यामध्ये त्यांनी चांगेल प्रदर्शन केले पाहिजे.”
रमीज राजांची इच्छा आहे की राष्ट्रीय क्रिकेटर चांगेल क्रिकेट खेळले पाहिजेत. याविषयी ते म्हणाले, “आपण समस्यांचा सामना करण्यासाठी आणि सामना गमावण्यसाठीही तयार राहिले पाहिजे. मी खेळाडूंना सांगितले की त्यांनी संघातील त्यांच्या स्थानाविषयी चिंता केली नाही पाहिजे आणि निर्भीड होऊन क्रिकेट खेळले पाहिजे.”
रमीज राजा पीसीबी अध्यक्ष होण्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि फलंदाजी प्रशिक्षक वकार यूनिस यांनी पदाच राजीनामा दिला आहे. सध्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत अब्दुर रज्जाक आणि सकलेन मुश्ताक यांच्यावर प्रिशिक्षकाची जाबाबदारी टाकली गेली आहे. आगामी टी २० विश्वचषकासाठी मॅथ्यू हेडन आणि वर्नोन फिलेंडर यांना पाकिस्तानचे अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक बनवले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘दुबईला लवकर यावे लागणे दुर्भाग्यपूर्ण, पण…’ मँचेस्टर कसोटी रद्द होण्याबद्दल विराटने सोडले मौन
‘इत्तू सा’, हिंदी भाषेबद्दल चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर डेविड मिलरने शेअर केले मजेशीर मीम