आयपीएल २०१९ मध्ये किंग इलेव्हन पंजाबकडून खेळताना भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश सलामीवीर जोस बटलरला बाद केले; तेव्हापासून मंकडींग हा क्रिकेटमध्ये बाद होण्याचा प्रकार नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता बरेचसे गोलंदाज फलंदाजाला सरळ बाद करण्यापेक्षा इशारा देण्यात धन्यता मानत असतात. चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज क्रिजबाहेर गेला तर, त्याला मंकडींग पद्धतीने बाद करण्याचा अधिकार गोलंदाजाला असतो. सध्या अनेक स्पर्धांमध्ये मंकडींग सर्रास होत असल्याने, फलंदाजही काळजी घेत असतात. मात्र, आज (१३ डिसेंबर) बिग बॅश लीगमध्ये अष्टपैलू जेम्स फॉकनर मंकडींग होण्यापासून वाचला.
फॉकनर वाचला मंकडींग होण्यापासून
आज (१० डिसेंबर) बिग बॅश लीग २०२०-२०२१ मधील पाचव्या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्स आणि होबार्ट हरीकेन्स या संघात झालेल्या सामन्यात मंकडींग प्रकार होता होता राहिला. ऍडलेड स्ट्रायकर्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज पीटर सिडल हा रन-अप पूर्ण केल्यानंतरही चेंडू न टाकता पुढे गेला.
त्याचं झालं असं की, ज्यावेळी सिडलने आपला रन-अप पूर्ण केला त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, नॉन स्ट्राइकला उभा असलेला फलंदाज जेम्स फॉकनर हा चेंडू टाकण्यापूर्वी क्रिजच्या खूप बाहेर आला आहे. अशा परिस्थितीत सिडलकडे फॉकनरला मंकडींग पद्धतीने बात करण्याची संधी होती. मात्र, त्याने तसे न करता त्याला फक्त इशारा दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहून हसू लागले.
होबार्टने मिळवला विजय
अत्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात होबार्ट हरीकेन्सने ऍडलेड स्ट्रायकर्सवर ११ धावांनी विजय मिळवला. ऍडलेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. होबार्टचा सलामीवीर डार्सी शॉर्टने ४८ चेंडूत ७२ धावा काढत ऍडलेडसमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऍडलेडचे फलंदाज मोठ्या भागीदार्या करू शकले नाहीत. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनियल बॉयरने सर्वाधिक ६२ धावा काढल्या. अकराव्या क्रमांकावरील डॅनी ब्रिग्ज ३५ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह होबार्टने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.
संबधित बातम्या:
– चेंडू लपवा आणि पळा! बिग बॅश लीग सामन्यादरम्यान घडली मजेशीर घटना, पाहा व्हिडिओ
– शेम टू शेम.! वाॅर्नरने घेतलं सुलतानचं रूप; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत
– याला म्हणतात चपळता! बीबीएलमध्ये गोलंदाजाने हुशारीने केले फलंदाजाला धावबाद; Video जोरदार व्हायरल