इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये प्ले ऑफची शर्यत अतिशय रंगतदार झाली. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारे 3 संघ निश्चित झाले आहेत, तर चौथा संघ कोणता असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ शर्यतीत आहेत. मात्र, कोलकाताचा मागील वर्षाचा इतिहास पाहता प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही याची भीती त्यांना जाणवत असेल.
कोलकाताचे प्ले ऑफमध्ये अद्यापही निश्चित नाही स्थान
कोलकाताने रविवारी (29 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत 8 व्या स्थानावरून 4 थ्या स्थानावर झेप घेतली. परंतु या संघांचे अद्यापही प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित झालेले नाही.
हैदराबादकडे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची असेल संधी
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स या 3 संघानी याआधीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आता चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ शर्यतीत कायम आहे.
केकेआर 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबाद 12 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे. जर हैदराबादने मुंबईला पराभूत केले, तर त्यांचा नेट रनरेट केकेआरपेक्षा अधिक असेल. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर येतील. मात्र, त्यांचा या सामन्यात पराभव झाला, तर केकेआर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवेल.
आयपीएल 2019 मध्ये हैदराबादने मारली होती बाजी
आयपीएल 2019 मध्येही चौथ्या स्थानासाठी हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात स्पर्धा होती. मागील हंगामात या दोन्ही संघांचे समान गुण होते. मात्र हैदराबादचा नेट रनरेट कोलकाताच्या नेट रनरेटपेक्षा अधिक असल्याने हैदराबादने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते.
त्यामुळे मागील हंगामातील इतिहास पाहता या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू की नाही याची भीती लागली असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या RCB विरुद्ध विजय मिळवण्याचे श्रेय अय्यरने दिले ‘या’ खेळाडूंना
‘करो या मरो’च्या लढाईत हैदराबाद करणार मुंबईशी दोन हात; पाहा दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने
ट्रेंडिंग लेख –
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?