भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौ-यावर (India Tour Of South Africa) आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ असा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली (India Lost Test Series). या संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) याने देखील यासोबत एक वर्तुळ पूर्ण केले.
द्रविडने एक वर्तुळ पूर्ण केले
या दौऱ्यावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड संघाला मार्गदर्शन करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ प्रथमच विदेशात कसोटी मालिका खेळत होता. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकत आघाडी घेतली. तर, जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या व केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. यासह भारत या मालिकेत पराभूत झाला. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत प्रथमच कोणत्यातरी मालिकेत पराभूत झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर भारतीय संघाला पहिला विजय राहुल द्रविड याच्याच नेतृत्वात मिळाला होता. २००६-२००७ मध्ये भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकली होती. मात्र, पुढील दोन सामने भारतीय संघाने गमावल्याने त्यांना ही मालिकादेखील गमवावी लागली होती. विशेष म्हणजे त्या मालिकेतील तिसरा सामना देखील केपटाऊन येथेच खेळला गेला होता. त्यामुळे कर्णधार व प्रशिक्षक या नात्याने दक्षिण आफ्रिकेत मालिका गमावणारा राहुल द्रविड पहिला खेळाडू बनला आहे. (Rahul Dravid Losses In South Africa As Captain & Coach)
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत नेहमीच अपयशी
भारतीय संघाला मागील ३० वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजय मिळवता आला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत आठ वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला असून, त्यापैकी सात वेळा संघ पराभूत झाला आहे. २०१०-२०११ मध्ये केवळ एकदाच भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता तरी रहाणे-पुजाराच्या जागा मोकळ्या होतील” (mahasports.in)
होत्याचे झाले नव्हते! केवळ विराटच नव्हेतर स्मिथही तरसतोय शतकासाठी! (mahasports.in)
सर्वकालीन महान सलामीवीराने रिषभला दिली ‘स्टँडिंग ओव्हेशन’; शतकी खेळीबाबत म्हणाला… (mahasports.in)