रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स यांच्यात आजचा दुसरा सामना झाला. रायगड संघ 3 विजय व 1 बरोबरीत सामन्यासह दुसऱ्या स्थानी होता. तर लातुर संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. रायगड संघाने आक्रमक सुरुवात करत लातूर संघावर सलग लोन पडत आघाडी मिळवली.
रायगड संघाने 26-06 अश्या भक्कम आघाडी नंतरही आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. प्रशांत जाधवच्या आक्रमक चढायानी रायगड संघाने मोठी आघाडी मिळवली. तर त्याला रुतिक पाटील ने चांगली साथ दिली.
रायगड संघाने 3 वेळा लातूर संघाला ऑल आऊट करत सामना 50-16 असा जिंकला. रायगड संघाकडून प्रशांत जाधव ने सर्वाधिक 24 गुण मिळवले. तर रुतिक पाटीलने 9 गुण मिळविले. तर जयेश गावंड ने 4 पकडी केल्या. लातूर कडून ऋषिकेश पांचाळ ने 6 गुण मिळवले. (Raigad Maratha Marvels jump to the top spot with their fourth win)
बेस्ट रेडर- प्रशांत जाधव, रायगड मराठा मार्वेल्स
बेस्ट डिफेंडर्स- जयेश गावंड, रायगड मराठा मार्वेल्स
कबड्डी का कमाल- अजिंक्य कालते, लातूर विजयनगारा विर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेलीगेशन फेरीत पालघर काझीरंगा रहिनोस, रायगड मराठा मार्वेल्स संघाचा तिसरा विजय
रेलीगेशन फेरीत पालघर काझीरंगा रहिनोस संघाचा चौथा विजय